
आंबडोस रवळनाथ मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात
01424
आंबडोस ः वर्धापन दिनानिमित्त भाविक व गावावासियांची झालेली गर्दी.
आंबडोस रवळनाथ मंदिर
वर्धापन दिन अलोट गर्दीत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः आंबडोस (ता. मालवण) ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीत झाला. यानिमित्त ५ व ६ मेस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
आंबडोस ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर प्रतिवर्षी मे महिन्यात त्याचा वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त नोकरीसाठी, शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर राहत असलेले गावामध्ये दाखल होतात. त्यानुसार यावर्षीही वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळीही गावातील रहिवासी व भाविकांची यानिमित्त गर्दी झाली होती. ५ मेस सकाळी ९ ते १२ यावेळेत शिवशक्ती याग कुंकुमार्चन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर १ ते ३ या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम झाला. सायंकाळी प्रथम महाआरती व स्थानिक भजने झाली. त्यानंतर ओरोस येथील ज्ञानेश्वर मेस्त्री यांचे सुश्राव्य भजन झाले. त्यानंतर पोईप येथील ओम येरम यांचे सुश्राव्य भजन झाले. ६ मेस सकाळी ९ ते १२ यावेळेत शिवशक्ती याग कुंकुमार्चन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर १ ते ३ या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम झाला. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा व महाआरती झाली. स्थानिक भजने व पालखी प्रदक्षिणा हा कार्यक्रम झाल्यावर रात्री गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ हळवल यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर झाला.