कुडाळ महसूल कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ महसूल कर्मचाऱ्यांचा
कौटुंबिक सोहळा उत्साहात
कुडाळ महसूल कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सोहळा उत्साहात

कुडाळ महसूल कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सोहळा उत्साहात

sakal_logo
By

01416
झाराप ः येथे आयोजित कार्यक्रमात पंढरपूरची वारी काढण्यात आली. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळ महसूल कर्मचाऱ्यांचा
कौटुंबिक सोहळा उत्साहात

झारापमध्ये विविध कार्यक्रमांचे सादरीकरण

कुडाळ, ता. ८ ः येथील महसूल कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सोहळा उत्साहात झाला. यावेळी दाखल झालेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या वारीत कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी स्वतः सहभाग घेत वारकऱ्यांच्या पावलावर ठेका धरला. एकुणच हा कार्यक्रम महसूल कर्मचाऱ्यांसाठी यादगार ठरला.
येथील तहसीलदार कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने तहसीलदार कार्यालय येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानंतर सायंकाळच्या सत्रात महसूल कर्मचारी संघटना कुडाळ व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाराप येथील आराध्या हॉटेल येथील सभागृहात केले होते. प्रभारी नायब तहसीलदार मोनिका कांबळे, श्वेता दळवी, अर्चना म्हापसेकर व क्रांती ठाकूर यांच्या समुहनृत्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर प्रतीक्षा वाईरकर यांचे समई नृत्य, करिष्मा मांजरेकर, दैवेश एडके, शमिका वारंग, नमिता पिंगुळकर, तहसीलदार पाठक व प्रभारी नायब तहसीलदार मोनिका कांबळे, पुरवठा निरक्षक नरेंद्र एडके यांनी गित सादरीकरण केले. यावेळी तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांनी काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली. पंढरीची वारी किनळोस गावातील दिंडी पथकाने सादर केली. यामध्ये तहसीलदार पाठकही सहभागी झाले. आर्य जाधव याने पोवाडा सादर केला. वेदिका राऊळ व खुशी हिने लावणी सादर केली. तलाठी लोबो यांनी आपल्या मुलीसह गिटारवर गीते सादर केली. प्रवीण मुंडे, नरेंद्र एडके, गणेश गोसावी, एकनाथ गंगावणे यांनी भजने सादर केली. शेवटी सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र गित सादर केले. नरेंद्र एडके व मोनिका कांबळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार उताणे, दोडामार्ग तहसीलदार अरूण खानोलकर, अमरसेन सावंत यांचीही उपस्थिती लाभली.