
आंबोली सैनिक स्कूलमध्ये कराटेसह योगा प्रशिक्षण शिबिर
01435
आंबोली ः कॅम्पमधील प्रशिक्षणार्थींसमवेत ब्रिगेडिअर सुधीर सावंत.
आंबोली सैनिक स्कूलमध्ये
कराटेसह योगाचे प्रशिक्षण
ओरोस, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग, सिलंबम (लाठी-काठी) असोसिएशन सिंधुदुर्ग, स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्ग, नवजीवन योगा प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर झाले. माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षणार्थींना ब्रिगेडिअर सावंत यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. शिबिरामध्ये कराटे, आर्मी ऑबस्टॅकल ट्रेनिंग, थाई बॉक्सिंग, ज्युडो, अकिदो, बॉक्सिग, स्क्वॅश, सिलंबम (लाठी-काठी) इत्यादी उपक्रम राबवले गेले. विशेष उपक्रमांमध्ये जंगल सफर, स्टेज डेअरिंग, व्हॅली क्रॉसिंग, ट्रेकिंग, कॅम्प फायर नाईट आदी उपक्रम घेण्यात आले. या शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोसचे प्राध्यापक ॲड. विवेक राणे यांनी केले. यावेळी ‘बेस्ट स्टुडन्ट ऑफ द कॅम्प’ हा अवॉर्ड आरोंदा गावातील विद्यार्थिनी गौतमी दुबळे हिला मिळाला. शिबिरातील विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्विसमन असोसिएशनचे सेक्रेटरी सुनील राऊळ यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन प्रसंगी संस्थेचे संचालक जॉय डांन्टस व ऑफिस सेक्रेटरी दीपक राऊळ उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षक म्हणून मृणाल मलये, जिशिना नायर, चित्राक्षा मुळये व सिद्धी पालव यांचे मार्गदर्शन लाभले. २१ ते २७ मे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे कराटे व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. विवेक राणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.