जयंती

जयंती

०१४५०


एस. एम. प्रशालेत राजर्षी शाहूंना वंदन
कणकवली, ता. ८ ः येथील एस.एम. हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती वायंगणकर होत्या. उपमुख्याध्यापक आर. एल. प्रधान व पर्यवेक्षक जी.एन. बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कणकवली शिक्षण संस्था कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छांचे वाचन करून मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. हेर्लेकर यांनी प्रास्ताविकात छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन शतक महोत्सवी वर्षामध्ये आयोजित कार्यक्रमांचा आढावा घेतला. यावेळी निबंध स्पर्धेचा विशेष उल्लेख केला. एस. एम. प्रशालेच्या ३९ विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांना क्रमांक मिळाले होते. आर्या कदम इयत्ता आठवी (क) या विद्यार्थिनीला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे २ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक मिळाले होते. प्रमुख वक्त्या प्रा. मनिषा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे दाखले देत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याचा परिपूर्ण आढावा आपल्या उत्तम प्रभावी वक्तृत्व शैलीमध्ये घेतला. पर्यवेक्षक जी.एन. बोडके यांनी शाहू महाराजांचे कार्य सांगताना एक सामान्य मुलगा राजर्षी शाहू महाराजांमुळे बालगंधर्व होऊ शकला हे सांगितले. उपमुख्याध्यापक श्री. प्रधान यांनी आपल्या मनोगतमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे इतके विविध अंगी आहे. ते समाजाचा प्रत्येक स्तरापर्यंत पोचले पाहिजे. त्यामुळे समाजाच्या भौतिक विकासाबरोबरच समाजातील प्रत्येकाचा उच्च वैचारिक विकास होऊ शकतो, असे स्पष्ट केले. मुख्याध्यापिका श्रीमती वायंगणकर यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांचे कार्य-विचार वाचण्यास प्रोत्साहित केले. सहाय्यक शिक्षिका सौ. गरगटे यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक शिक्षक ए. ए. जगदाळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com