खेड-भरणे मार्गावर वाहनचालक मोकाट जनावरांनी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-भरणे मार्गावर वाहनचालक मोकाट जनावरांनी त्रस्त
खेड-भरणे मार्गावर वाहनचालक मोकाट जनावरांनी त्रस्त

खेड-भरणे मार्गावर वाहनचालक मोकाट जनावरांनी त्रस्त

sakal_logo
By

३२ (पान २ साठी)

खेड-भरणे मार्गावर मोकाट जनावरांचा त्रास

खेड, ता. ८ ः गेल्या काही दिवसांपासून खेड-भरणे मार्गावर मोकाट जनावरांचा वावर सुरू आहे. या जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाईसाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने फावले आहे; मात्र या जनावरांच्या उपद्रवाने वाहनचालकांसह पादचारी त्रस्त आहेत. ही जनावरे कोणत्याही क्षणी मार्गात आडवी येत असल्याने सातत्याने अपघातदेखील घडत आहेत; मात्र तरीदेखील मालकांवर कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
खेड-भरणे मार्ग वाहनांसह पादचाऱ्यांच्या रेलचेलीने सतत गजबजलेला असतो. या मार्गावर रस्त्यालगत बस्तान ठोकणाऱ्या फेरीवाल्यांमुळे हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. याशिवाय रस्त्यालगत सर्रासपणे वाहनेदेखील उभी केली जात असल्याने हा मार्ग वाहनतळच बनत चालला आहे. यात आता मोकाट जनावरांचीही भर पडली आहे. भररस्त्यातच मोकाट जनावरे बस्तान ठोकत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे वाहतूक कोंडीदेखील होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय मोकाट जनावरे कोणत्याही क्षणी मार्गात आडवी येत असल्याने सातत्याने अपघातदेखील घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी मार्गात आडव्या आलेल्या बैलामुळे झालेल्या अपघातात एका तरुणास हकनाक प्राणदेखील गमवावा लागला होता. मात्र, तरीदेखील मार्गावर मोकाट जनावरांचा उपद्रव सुरूच आहे. मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असतानाही त्याकडे कानाडोळाच केला जात आहे. याचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

--