कणकवलीत ‘सेल्‍फी विथ शौचालय’

कणकवलीत ‘सेल्‍फी विथ शौचालय’

01490
कणकवली : शहरातील भाजी मार्केटमध्ये उभारणी होत असलेल्‍या शौचालयाबाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सेल्‍फी विथ शौचालय’ आंदोलन केले.


कणकवलीत ‘सेल्‍फी विथ शौचालय’

ठाकरे गटाचे आंदोलन; नगरपंचायतीच्या कामावर ताशेरे

कणकवली, ता.८ : येथील नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते सुशांत नाईक यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘सेल्‍फी विथ शौचालय’ असे आंदोलन केले. शौचालय बांधणीसाठी प्रतिचौरस फुटाला १० हजार ५०० रूपये एवढा खर्च येत असल्‍याने हा उपक्रम राबविल्‍याची माहिती सुशांत नाईक यांनी दिली.
श्री.नाईक म्‍हणाले, ‘‘सध्याच्या बाजारभावानुसार घरकुल बांधण्यासाठी दोन हजार रूपये चौरस फुट असा खर्च येतो; मात्र कणकवली नगरपंचायतीने शौचालय बांधणीसाठी १० हजार ५०० रूपये प्रमाणे प्रतिचौरस फुट दर निश्‍चित केला आहे. त्‍यानुसार ८०० चौरस फुटाच्या शौचालयासाठी ८६ लाख रूपये खर्च केले जात आहेत. कणकवली नगरपंचायत प्रचंड पैसे खर्च करून भाजी मार्केटमध्ये ८६ लाखांचे शौचालय बांधत आहे. त्‍यामुळे एवढ्या महागड्या शौचालय इमारतीसमोर आम्‍हाला आज उपरोधात्‍मक आंदोलन करावे लागले, अशी माहिती माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्‍हा युवा संघटक सुशांत नाईक यांनी दिली.
या आंदोलनात श्री.नाईक यांच्यासह माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर तसेच राजू राठोड, साई कोदे, सुजित जाधव, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, तेजस राणे, गौरव हर्णे, महेश कोदे आदी उपस्थित होते. दरम्‍यान, ‘सेल्‍फी विथ शौचालय’ या आंदोलनाच्या माध्यमातून नगरपंचायतीचा भ्रष्‍टाचार जनतेसमोर आणत असल्‍याचे माजी नगरसेवक कन्हैया पारकर म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com