पोदार प्रेपमध्ये किज्युकेशन हडल उत्साहात

पोदार प्रेपमध्ये किज्युकेशन हडल उत्साहात

३८ (पान ५ साठी)

-rat८p३४.jpg-
२३M०१४९५
रत्नागिरी ः पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित किज्युकेशन हडल उपक्रमात सहभागी पालक, विद्यार्थी.
---------------

पोदार प्रेपमध्ये किज्युकेशन हडल उत्साहात

पावस, ता. ८ ः रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील पोदार प्रेपमध्ये फर्स्ट किज्युकेशन हडल हा पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठीचा विशेष उपक्रम उत्साहात झाला. यामध्ये शिक्षकांनी लहान मुलांना पोदार शाळेमध्ये कोणत्या अनोख्या पद्धतीने शिकवले जाते, खेळातून शिक्षण कसे शिकवले जाते हे पालकांना कळावे आणि त्यांना आपल्या पाल्यांना घरीसुद्धा त्याप्रमाणे कसे हाताळावे हे प्रात्यक्षिकासह वर्ग घेऊन दाखवण्यात आले.
या उपक्रमाद्वारे शाळेत आणि घरी मुलांना एकाच पद्धतीने शिकवले जाईल जेणेकरून शाळेचे शिक्षक आणि पालक यांच्या शिकवण्यात समन्वय राहील, यावर विशेष भर देण्यात आला. पालकांचा या उपक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेच्या प्रेसिडेंट डॉ. स्वाती पोपट वत्स यांच्या व्हिडिओ मेसेजद्वारे शाळेमध्ये वेळेमध्ये येण्याचे महत्व काय आणि त्याचे पुढील आयुष्यासाठी असलेले महत्व हे देखील पालकांना समजावून सांगण्यात आले. शाळेमध्ये असेच नवनवीन आणि आगळेवेगळे उपक्रम आगामी शैक्षणिक वर्षात घेण्यात येणार आहेत, असे पोदार प्रेप व्यवस्थापनाने या प्रसंगी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com