बोरगावर दाम्पत्याचा सावंतवाडीत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरगावर दाम्पत्याचा
सावंतवाडीत सत्कार
बोरगावर दाम्पत्याचा सावंतवाडीत सत्कार

बोरगावर दाम्पत्याचा सावंतवाडीत सत्कार

sakal_logo
By

01659
सावंतवाडी : मार्गदर्शन करताना प्रकाश बोरगावकर.

बोरगावकर दाम्पत्याचा
सावंतवाडीत सत्कार

सावंतवाडी, ता. ८ ः जागतिक पातळीवर ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या हेल्पेज इंडिया संस्थेचे, गोवा महाराष्ट्र प्रांताचे कुशल संघटक प्रकाश बोरगावकर यांचा निवृत्तीनिमित्त येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष बळवंत मसूरकर यांचे हस्ते हा सत्कार झाला.
यावेळी संघाचे सर्व संचालक, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बोरगावकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या बहूमूल्य अशा अनुभवांचे कथन केले. त्यांच्या पत्नी निशा बोरगावकर यांचाही सौभाग्याचे लेणे देऊन संघाच्या संचालिका सुलभा टोपले यांनी सन्मान केला. या सत्कार सोहळ्याला बोरगावकर यांचे निकटवर्तीय व गोवा हेल्पेज इंडियाचे संघटक दत्तप्रसाद पावसकर, नागपूर हेल्पेज इंडीयाचे निवृत्त संघटक सुनील ठाकूर, पुणे हेल्पेज इंडियाचे विद्यमान संघटक राजीव कुलकर्णी उपस्थित होते. संघाचे सदस्य रामदास पारकर यांचे चिरंजीव वैभव पारकर यांना पुणे येथील राष्ट्रीय जादूगार संस्थेकडून ‘जादूभूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. संघाचे सल्लागार अण्णा देसाई यांनी प्रास्ताविक केले. अर्चना वझे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. अरुण मेस्त्री यांनी आभार मानले.