वीज ग्राहकांना पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक

वीज ग्राहकांना पुन्हा अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक

.४१ (पान ३ साठी)

(लोगो वापरावा)

वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीचा शॉक

सहा मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार ; प्रीपेड मीटरची सवलत

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः महावितरणने जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले पाठवली आहेत. ती एकरकमी किंवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले भरणे शक्य नसल्यास २० किलोवॅटपेक्षा कमी जोडभार असलेल्या ग्राहकांना प्रीपेड मीटरच्या मागणीचा पर्यायही उपलब्ध आहे. प्रीपेड मीटरवर कोणतीही सुरक्षा ठेव भरावी लागत नाही तसेच वीजदरात दोन टक्के सवलतही मिळते.
जिल्ह्यातील सर्व वीजग्राहकांना चालू वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रकमेची बिले देण्यात आली आहेत. त्यावरून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीजपुरवठा संहितेनुसारच वीजग्राहकांकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारली जाते. यापूर्वी सुरक्षा ठेवीची रक्कम एका महिन्याच्या बिलाइतकी होती. मात्र, नवीन नियमांनुसार एप्रिल २०२२ पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्येही अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची बिले आली होती. त्या वेळी ज्यांनी भरणा केला नाही त्यांना यंदाच्या वर्षी पुन्हा बिले पाठवण्यात आली आहेत.
राज्य वीज नियामक आयोगाने अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले भरण्यासाठी सहा हप्त्यांची सवलत दिली आहे. महावितरणने वीजग्राहकांना दिलेल्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम सहा समान मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल, अशी माहिती बिलामध्ये इंग्रजी भाषेत दिली आहे.अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम एकरकमी किंवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरणे शक्य नाही, अशा ग्राहकांसाठी प्रीपेड मीटरचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र, २० किलोवॅटपेक्षा कमी जोडभार असलेल्या ग्राहकांनाच प्रीपेड मीटरसाठी अर्ज करता येणार आहे. अशा वीजग्राहकांनी प्रीपेड मीटर घेतल्यास सध्याची जमा सुरक्षा अनामत रक्कम त्यांच्या प्रीपेड खात्यामध्ये वर्ग केली जाईल. त्यातून त्यांच्या पुढील वीज वापराची रक्कम वजा केली जाते तसेच वीज आकार व इंधन समायोजन आकारात अतिरिक्त २ टक्के वीजदर सवलतही मिळते.
--
कोट
ग्राहकांच्या बिलाचा अंदाज घेऊन एप्रिल महिन्यात अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कमेची मागणी केली जाते. वीजबिलात प्रीपेड मीटरबाबत सूचना आहेत; मात्र आम्हाला अजून सूचना आलेल्या नाहीत. ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरून महावितरणला सहकार्य करावे.
- कैलास लवेकर, कार्यकारी अभियंता महावितरण, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com