हापूसची आवक 15 मे नंतर वाढेल

हापूसची आवक 15 मे नंतर वाढेल

३४ ( पान ३ साठीमेन)

- rat८p३०.jpg-
२३M०१४७८
रत्नागिरी ः झाडांना लागलेला मोहोर
- rat८p३१.jpg-
२३M०१४७९
रत्नागिरी ः फळांवर पडलेले डाग
-------------
उत्पादन कमी असल्याने हापूसचे भाव चढेच

आवक १५ मे नंतर वाढणार ; ५ डझनच्या पेटीला ३५०० रुपये
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत असून, त्याचा फटका हापूसलाही बसला आहे. आंबा बाहेरुन भाजत असून, साका होण्याची भीती आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने मुंबईतील वाशीसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये २०,००० पेटी हापूस जात आहे. त्यामुळे हापूसचे दर पाच डझनच्या पेटीला साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे. आता १५ मे नंतर हापूसची आवक वाढेल असे आंबा बागायतदारांकडून सांगितले जात आहे.
फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काही प्रमाणात फळं लागली; परंतु अवकाळी पावसामुळे ती रोगराईत सापडून गळून गेली. यावर्षी उत्पादनात मोठी घट दिसू झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रत्येक महिन्यात पाऊस हजेरी लावत आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही ठिकाणी हलका पाऊस, ढगाळ वातावरण अशी स्थिती होती. याबरोबरच उष्णताही कायम आहे. कडकडीत उन्हाचा परिणाम हापूसवर दिसून येतो. आंबा बाहेरुन भाजल्याने त्यात साका होऊ शकतो. पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भावाची शक्यता आहे. दर्जेदार फळ शोधून ते बाजारात नेण्याचे आव्हान यंदा आंबा बागायतदारांपुढे आहे.
सध्या रत्नागिरीतील काही बागायतदारांना जागेवरच दर चांगला मिळत आहे. मार्केटिंगमधील काही मोठ्या कंपन्याही थेट बागायतदारांच्या दरवाज्यात येऊ लागल्यामुळे वाशीमध्ये आंबा पेटी जाण्याचे प्रमाण वीस टक्क्याने घटले. तेथील दलालांची अनेक माणसे रत्नागिरीत येऊन माल खरेदी करत आहेत. हा मोठा बदल असल्याचे बागायतदारांचे मत आहे. मे महिन्याच्या दुसऱ्‍या आठवड्यातील चढे दर प्रथमच राहिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हापूसची चव घेता आलेली नाही. सध्या वाशी बाजारातील आवक अत्यंत कमी आहे. हापूसच्या वीस हजार तर अन्य राज्यातील आंब्यांच्या पेट्या ४८ हजार असे चित्र आहे. आवक घटल्याने हापूसचे दर कमी झालेले नाहीत. सध्या डझनला पाचशे ते सहाशे रुपये दर आहे.
--
चौकट
अखेरच्या टप्प्यात मोहोर
आंबा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असतानाच काही बागांमध्ये मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या मोहोराचा काहीच उपयोग नसल्याचे बागायतदारांचे मत आहे. ढगाळ वातावरणामुळे या मोहोरावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचा परिणाम झाडाला असलेल्या आंब्यावर होऊ शकते अशी भिती आहे.
---
कोट
वातावरणातील बदलांमुळे हापूसची आवक कमी आहे. शेवटच्या टप्प्यातील आंबा मे महिन्याच्या दुसऱ्‍या पंधरवड्यात मिळेल. सध्या अनेक बागायतदारांकडे आंबाच उपलब्ध नाही.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com