
घनकचर्याची पावसाळ्यापूर्वी विल्हेवाट लावा
01543
जामसंडे ः येथील कचरा साठवणूकीच्या ठिकाणी भाजप पदाधिकार्यांनी भेट देऊन नगरपंचायत प्रशासनाशी संवाद साधला. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
घनकचऱ्याची विल्हेवाट
पावसाळ्यापूर्वी लावा
देवगड नगरपंचायतीकडून कार्यवाहीची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने घनकचरा साठवण करीत असलेल्या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी अचानक भेट दिली. त्यानंतर नगरपंचायत प्रशासन प्रतिनिधीही तेथे पोचले. पावसापूर्वी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे करताच लवकरच आवश्यक प्रशासकीय बाबी पूर्ण करून कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाकडून आश्वासित करण्यात आले.
येथील जामसंडे भागातील एका जागेत सुका कचरा साठवण करून ठेवलेल्या ठिकाणी भाजप देवगड मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांच्यासह नगरसेवक शरद ठुकरूल, तन्वी चांदोस्कर, उमेश कणेरकर, योगेश चांदोस्कर, दयानंद पाटील आदींनी भेट देऊन पहाणी केली. याचवेळी नगरपंचायतीचे उमेश स्वामी, अमोल पाटील यांच्यासह अन्य तेथे पोचले. घनकचर्याची पावसापूर्वी विल्हेवाट लावण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली. यावर आवश्यक निविदा प्रक्रीया पूर्ण करून कचर्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. साठवलेला सुका कचरा वार्याने पसरला होता. मात्र त्याला दुर्गंधी येत नव्हती. दरम्यान, सत्ताधारी नगरसेवक विशाल मांजरेकर यांना विचारले असता त्यांनी, कचर्याची लवकरच विल्हेवाट लावली जाईल. याचा नागरिकांना त्रास होणार नाही असे सांगितले.