सकाळ रत्नागिरी आवृत्तीचा उद्या वर्धापनदिन

सकाळ रत्नागिरी आवृत्तीचा उद्या वर्धापनदिन

पान १ साठी


सकाळ रत्नागिरी आवृत्तीचा उद्या वर्धापनदिन


अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन ; ३४ वर्षे वाचकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः ‘सकाळ’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ३४ वा वर्धापनदिन समारंभ बुधवारी (ता. १०) आयोजित केला आहे. या निमित्त वाचकांसाठी स्नेहमेळावा, चहापान आणि अभंगवाणी या सूरमयी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत जयस्तंभ येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.
‘सकाळ’ने नवनवे उपक्रम हाती घेतले. रत्नागिरीत गेली ३४ वर्षे ‘सकाळ’ची पाळेमुळे चांगलीच रूजली आहेत. सामाजिक कार्यातही ‘सकाळ’ने अग्रेसर भूमिका घेतली आहे तसेच मच्छीमार, आंबा, काजू बागायतदारांचे प्रश्न, रत्नागिरीतील विविध समस्यांवर लेखन करून जनमानसात ‘सकाळ’ने नाव मिळवले आहे. खात्रीशीर व निःपक्षपाती बातम्यांमुळे ‘सकाळ’ लोकप्रिय आहे. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून रत्नागिरीतील सप्तसूर म्युझिकल्स प्रस्तुत ‘अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रम सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होईल. यामध्ये गायक कलाकार हेमंत देशमुख, नरेंद्र रानडे, करुणा पटवर्धन गायन करतील. त्यांना साथसंगत तबला अभिषेक भालेकर, हार्मोनियम निरंजन गोडबोले, तालवाद्य सुहास सोहोनी करणार असून, निवेदन वामन जोग करणार आहेत. सप्तसूर म्युझिकल्स रत्नागिरी ही संस्था रत्नागिरीतील नवोदितांना रंगमंचावर संधी देण्यात अग्रेसर आहे. या संस्थेतर्फे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथेही गेली पाच वर्ष सप्तसूरचे सादरीकरण होत आहे. गेली चार वर्ष परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस यांच्या संजीवनी गाथा या अभंग गाथेतील अभंगांची राज्यस्तरीय स्पर्धा घेत आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. सप्तसूर म्युझिकल्स ही संस्था उभी होण्यामागे संस्थेचे मुख्य पदाधिकारी पदाधिकारी निखिल रानडे, संतोष आठवले आणि संस्थेचे सर्वेसर्वा निरंजन गोडबाले तसेच श्रीनिवास जोशी, राजेंद्र पटवर्धन, हेरंब जोगळेकर आदींचा मोलाचा वाटा आहे. रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी ''अभंगवाणी'' कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com