
नळपाणी योजना
ratchl८२.jpg ःKOP२३M०१३७४
चिपळूण ः बामणोली येथील पाणी योजनेच्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित मान्यवर.
श्रमदानातून बामणोलीत नळपाणी योजना
घरोघरी पाणी ः १२०० मीटरवरून झऱ्याचे पाणी वाडीत
चिपळूण, ता. ९ ः तालुक्यातील बामणोली येथे दीप जनसेवा समिती, साळुंखे परिवार आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून नैसर्गिक जलस्रोतातून ग्रॅव्हिटी नळपाणी योजनेचे लोकार्पण नुकतेच झाले. या माध्यमातून पाणी घरोघरी पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.
कोरोना असो अथवा महापूर असो, दीप जनसेवा समिती आणि साळुंखे परिवार जनतेच्या मदतीला पुढे येतात. कोरोना व महापूर काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले होते. काही महिन्यांपूर्वी चिवेली जाडेवाडी येथील ग्रामस्थांची पाणीटंचाई लक्षात घेऊन डोंगराच्या कुशीत असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांचे पाणी ग्रॅव्हिटीने ग्रामस्थांच्या घरोघरी पोहोचवले. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या पाणीटंचाईचा प्रश्न दूर झाला. आता बामणोली येथे नैसर्गिक जलस्रोताच्या आधारे ग्रॅव्हिटी नळपाणी योजना राबवण्यात आली. सुमारे १२०० मीटर अंतरावरून झऱ्याचे पाणी बामणोली येथील डिंगणकरवाडी, गवळवाडी, बौद्धवाडी, पूर्व वणेवाडी, पश्चिम वणेवाडी येथील पाच वाड्यांमध्ये ग्रॅव्हिटीने पोहोचवण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनीदेखील मेहनत घेतली. या नळपाणी योजनेचे नुकतेच लोकार्पण झाले. यावेळी सुभाष साळुंखे, विलास साळुंखे, दीपक साळुंखे, विकास साळुंखे, सुविधा साळुंखे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट
दीप जनसेवा समिती, मुंबईच्या माध्यमातून व साळुंखे परिवाराच्या पुढाकाराने ग्रॅव्हिटी नळपाणी योजना राबवून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येत आहे, याचा आपल्याला आनंद वाटतो. विशेष म्हणजे पाणी टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या घरोघरी पोचल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आपल्याला समाधान मिळते. यासारखे पुण्याईचे काम कोणतेच नाही.
- सुनील साळुंखे, दीप जनसेवा समिती, मुंबई.