
काडवली धरण
-ratchl८१.jpg ःKOP२३M०१३७३
चिपळूण ः काडवली येथे अधिकारी व ग्रामस्थांची झालेली बैठक.
काडवलीतील धरणासाठी ग्रामस्थ सकारात्मक
अधिकाऱ्यांसमवेत बैठक ; मातीचे धरण मंजूर, ५५ कोटी २८ लाखाचा खर्च, चार वर्षाची मुदत
चिपळूण, ता. ९ ः खेड तालुक्यातील काडवली येथे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातर्फे नियोजित धरणाविषयी काडवली पाचघरवाडी येथील श्रीराम मंदिरात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत धरणग्रस्त व ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी धरणग्रस्त तसेच ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले. या धरणाला येथील ग्रामस्थांनी सकारात्मकता दर्शवली.
काडवली येथे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातर्फे धरण मंजूर झाले आहे. या धरणाच्या कामाविषयी तसेच मोबदला व अन्य प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत धरणग्रस्त व ग्रामस्थांची नुकतीच बैठक झाली. बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा लांबे, सरपंच भक्ती महाडिक उपस्थित होते. जलसंधारण विभाग चिपळूणचे अधिकारी सागर भराडे यांनी काडवली येथे होत असलेल्या धरणाविषयी तांत्रिक माहिती दिली. हे धरण मातीचे असून धरणाची ३१५ मीटर लांबी असून उंची ३३ मीटर उंची आहे. या धरणाच्या कामासाठी ५५ कोटी २८ लाख ४८ हजार ८३५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा कालावधी ४ वर्षांचा आहे. भूसंपादन अधिकारी अशोक खेतले यांनी भूसंपादन, कृषी अधिकारी जगदीश शिंदे यांनी वृक्षमोजणी, भूमी अभिलेख मोजणी अधिकारी मंदार पाटकर यांनी भूमीमोजणी प्रक्रियेविषयी माहिती दिली. यानंतर धरणग्रस्त विजय राणे, जगदीश महाडिक, वसंत पड्याळ, दीपक खाडे, अंकुश जाधव, संकेत सावंत आदी धरणग्रस्त व ग्रामस्थांनी धरणाविषयी तांत्रिक सखोल माहितीसंदर्भात मोबदला, भविष्यात स्थलांतर, धोके आदी प्रश्न उपस्थित करून शंकांचे निरसन करून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी माजी पोलिस पाटील संभाजी महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश महाडिक, माजी सरपंच जगदीप महाडिक, माजी सरपंच रमेश मांजरेकर, माजी उपसरपंच राकेश महाडिक, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर चव्हाण, माजी सदस्य मनोज काजवे, वसंत खाडे उपस्थित होते.