
रत्नागिरी- वैभव विहार सोसायटीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
१४ (टुडे पान २ साठी)
- rat९p३.jpg-
२३M०१६०३
रत्नागिरी : वैभव विहार सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात समूहनृत्य सादर करताना महिला.
वैभव विहार सोसायटीचे स्नेहसंमेलन
रत्नागिरी, ता. ९ : जुना माळनाका येथील वैभव विहार को- ऑपेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे १६ वे वार्षिक स्नेहसंमेलन व श्री सत्यनारायण पूजा मोठ्या उत्साहात झाली. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका स्मितल पावसकर आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र भाटकर उपस्थित होते.
सोसायटीच्या प्रांगणात फनी गेम्स, लावणी, समूह नृत्य, महाराष्ट्र गौरव गीत गायन असे कार्यकम उपस्थितांच्या उत्साही प्रतिसादात रंगले. निवेदन उदय गोवळकर व डॉ. अंकुश खरवतेकर यांनी केले. निबंध लेखन, चित्रकला, रांगोळी आणि कॅरम, व्हॉलीबॉल स्पर्धाही झाल्या. श्री सत्यनारायण पूजेचे यजमानपद सोसायटीचे अध्यक्ष लीलाधर भडकमकर आणि लीना भडकमकर यांनी भूषवले.
स्नेहसंमेलनाच्या समारोपावेळी माजी ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर यांना नुकताच पुरस्कार प्रदान केल्याबद्दल समिती सदस्य विनया परब यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सुदाम आंब्रे यांना आत्मचरित्र लेखनाबद्दल, तर वैद्यकीय पदवीप्राप्त डॉ. मंदार कांबळे, डॉ. पूजा कांबळे, डॉ. राखी जाधव, डॉ. ऋतुजा आग्रे व शास्त्रीय संगीत क्षेत्रातील यशाबद्दल गायक चैतन्य परब व आकर्षक रांगोळी काढणारे संदीप साळवी यांना सन्मानित केले. या वेळी सचिव संजय हर्डिकर, खजिनदार विक्रम गायकवाड, सदस्य उदय कोतवडेकर, विजय बेंद्रे, अनिल सावंत, मिलिंद कांबळे, अनंत जाधव, विनया परब, आणि डॉ. अभिजित कसालकर, डॉ. अंकुश खरवतेकर उपस्थित होते.