
आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक कलावंतांच्या संघटनेची नितांत आवश्यकता
२० (टुडे पान २ साठी)
- ratchl९१.jpg ः
२३M०१६३०
चिपळूण ः मार्गदर्शन करताना लेखिका उर्मिलाताई पवार.
---
साहित्यिक कलावंतांच्या संघटनेची गरज
उर्मिलाताई पवार ; साहित्यिक-कलावंत संस्था उभारणीचा ठराव संमत
चिपळूण, ता. १० ः मराठी साहित्यामध्ये विविध प्रवाह कार्यरत आहेत. या सर्व साहित्य प्रवाहात दलित साहित्य तथा आताच्या परिभाषेत फुले-आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य प्रचलित आहे. आंबेडकरी साहित्य हा एक सशक्त आणि दर्जेदार प्रवाह आहे; मात्र आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक-कलावंत एखाद्या मध्यवर्ती संघटनेच्या अभावी विखुरले गेल्यामुळे त्यांना पुरेसा वाव मिळत नाही. म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक, कलावंतांसाठी संघटनेची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी साहित्यिका,आंबेडकरी विचारवंत, लेखिका उर्मिलाताई पवार यांनी येथे केले.
सम्यक संवादतर्फे चिपळूण येथील चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात पहिल्या सम्यक साहित्य कला संगीताचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या ‘कोकण विभागात आंबेडकरी साहित्यिक, कलावंत संघटनेची गरज’ या परिसंवादात बोलत होत्या. त्या म्हणाल्या, साठोत्तरीच्या काळात दलित साहित्याचा तथा आंबेडकरी साहित्याचा उदय झाला. त्याबरोबरच नव्या दमाचे आंबेडकरी साहित्यिक उदयास आले; मात्र प्रस्थापित साहित्य व्यवहारात अनेकांना पुरेसे स्थान मानसन्मान लाभू शकले नाही. याला अनेकविध कारणे असतील; परंतु या पुढच्या काळात चळवळीतील नव्या साहित्य कलावंतांसाठी आपण स्वतंत्र असे विचारपीठ तयार करून दिले पाहिजे म्हणजे त्यांना योग्य ते मार्गदर्शन लाभू शकते. याकरिता संघटनेची आवश्यकता आहे. कोकणातील साहित्यिकांनी घेतलेला हा पुढाकार त्यासाठी मला महत्वाचा वाटतो. प्रा. आशालता कांबळे म्हणाल्या, कोकणातील साहित्यिकांना नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यांच्यावर प्रांतवादाचा शिक्का मारला जातो; मात्र विभागानुसार, प्रांतानुसार छोट्या-मोठ्या संघटना उभ्या राहिल्या पाहिजे. अशा छोट्या छोट्या संघटनांमधूनच मोठ्या संघटना आकाराला येतात.