मळेवाडला तिहेरी अपघातात
डंपरसह मोटारीचे नुकसान

मळेवाडला तिहेरी अपघातात डंपरसह मोटारीचे नुकसान

01635
मळेवाड ः अपघातग्रस्त डंपर.

मळेवाडला तिहेरी अपघातात
डंपरसह मोटारीचे नुकसान
मळेवाड ः येथे दोन डंपर आणि मोटारीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अधिक माहिती अशी की, मळेवाड जकातनाका येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कळणेहून रेडीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने मळेवाडहून कळणेच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या डंपरला धडक दिली. त्यानंतर ज्या डंपरने धडक दिली, त्याचे पाटे तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या मोटारीला धडक दिली. यात डंपर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कंपाउंडला धडकला. या अपघातात मोटारीसह डंपरचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. उशिरापर्यंत अपघाताची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com