-जनसेवा ग्रंथालय देणार वाचकांना घरपोच पुस्तके

-जनसेवा ग्रंथालय देणार वाचकांना घरपोच पुस्तके

८ (टुडे पान १ साठी)


-rat९p१७.jpg-
२३M०१६४९
रत्नागिरी ः जनसेवा ग्रंथालयातील ग्रंथसंपदा.
---
काही सुखद--लोगो

जनसेवा ग्रंथालयाकडून घरपोच पुस्तके

मोबाईल लायब्ररी ; प्राथमिक टप्प्यात मर्यादित भागांसाठी योजना

रत्नागिरी, ता. ९ : सध्याच्या धावपळीच्या युगात वाचकाला अनेकदा ग्रंथालयात जाण्यासाठी वेळ मिळत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने वाचनालयात जाणे न झाल्यामुळे नवीन पुस्तक घेता येत नाही. याशिवाय आजारपण, वृद्धत्व, प्रवासातील अडचणी, ग्रंथालय आणि वाचकांचे वेळेचे गणित न जमणे, न परवडणारा रिक्षाचा प्रवासखर्च या अनेक कारणांमुळे पुस्तक बदलण्यासाठी ग्रंथालयात जाणे लांबते. यामुळे भरपूर वाचायची इच्छा असूनही ग्रंथालयात जाता येत नाही. अशा रत्नागिरी शहरातल्या वाचकांसाठी ‘मोबाईल लायब्ररी’ हा उपक्रम पुनर्जिवित करण्याचा संकल्प रत्नागिरी शहरातील जनसेवा ग्रंथालयाने सोडला आहे.
या उपक्रमांतर्गत वाचायची इच्छा आहे, पण वेळेअभावी ग्रंथालयात येणे शक्य नसणाऱ्‍या रत्नागिरी शहरातील वाचकांना घरपोच आठवड्यातून एकवेळा प्रत्येकी २ पुस्तके ग्रंथालयामार्फत पाठविण्यात येतील. यासाठी नेहमीच्या वर्गणीसोबत पुस्तक घरपोच करण्याबाबतचे नाममात्र शुल्क आकारले जाईल. वाचकांच्या मागणीनुसार ग्रंथालय घरपोच पुस्तके देणार असल्यामुळे ग्रंथालयात येण्यासाठीचा वाचकांचा ५० ते ६० रुपयांचा रिक्षा भाडे खर्चही वाचू शकेल.
ही योजना रत्नागिरी शहरातील जनसेवा ग्रंथालय कक्षेत असणाऱ्‍या म्हणजेच परटवणे, बंदररोड, टिळक आळी, झाडगाव, तेलीआळी, आठवडा बाजार, जयस्तंभ या भागांसाठी मर्यादित ठेवली आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा ज्या वाचकांना या योजनेत सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी आपली नावे जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मीचौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com