‘परफेक्ट’मुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

‘परफेक्ट’मुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

01661
सिंधुदुर्गनगरी ः येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना लक्ष्मीकांत पार्सेकर. शेजारी स्मिता पार्सेकर, नानासाहेब बेहरे, नकुल पार्सेकर, महादेव परब, शेखर सावंत, शामल नाईक, अच्युत सावंत-भोसले, प्रा. राजाराम परब आदी.

‘परफेक्ट’मुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

लक्ष्मीकांत पार्सेकर; ओरोसमध्ये संस्था शाखेचे उद्‍घाटन

सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवून समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी परफेक्ट अॅकॅडमीचे योगदान स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काढले.
ओरोस येथे नव्याने स्थापन केलेल्या परफेक्ट अॅकॅडमी संस्था शाखेचे उद्‍घाटन गोव्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी त्यांच्या पत्नी स्मिता पार्सेकर, नानासाहेब बेहरे, नकूल पार्सेकर, महादेव परब, शेखर सावंत, शामल नाईक, भोसले सावंत कॉलेजचे अच्युत सावंत-भोसले, प्रा. राजाराम परब आदी उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
श्री. पार्सेकर म्हणाले, ‘‘शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा अनेक अॅकॅडमी गोव्यात आहेत; परंतु ‘परफेक्ट’ने गोव्यासह अन्य भागात स्थापन केलेल्या शाखा उत्तम प्रकारे शिक्षण देत आहेत. परब यांनी या अॅकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवून डॉक्टर, इंजिनिअर व अन्य क्षेत्रात सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचे कार्य ‘परफेक्ट’ आहे. तामिळनाडूसारख्या भागात प्रथम लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतर होऊ पाहत आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रा. परब यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.’
नानासाहेब बेहरे, भोसले-सावंत कॉलेजचे अच्युत भोसले यांनीही ॲकॅडमीबाबत मत मांडले. प्रारंभी प्रा. परब यांनी प्रास्ताविकात अॅकॅडमीच्या प्रवासाची व आतापर्यंत सुरू असलेल्या शाखा, त्यातून डॉक्टर, इंजिनियर व अन्य क्षेत्रात चमकलेल्या विद्यार्थ्यांची यशोगाथा कथन करताना आतापर्यंत ७० ते ८० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे सांगितले. जून अखेरीस विद्यार्थी संख्या वाढण्याचा विश्वास व्यक्त करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याना चांगल्या सुविधा उपलब्ध करून योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. शुभम धुरी यांनी सूत्रसंचालन केले. मंदार सर्वेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com