सीएनजी रिक्षाचालकांकडून पूर्वीप्रमाणेच भाडे

सीएनजी रिक्षाचालकांकडून पूर्वीप्रमाणेच भाडे

१५ (पान २ साठी)

रिक्षाचालकांकडून पूर्वीप्रमाणेच भाडे


सीएनजी असूनही ग्राहकांची लूट ; रिक्षाचालक म्हणतात आमचे म्हणे ऐका

चिपळूण, ता. ९ ः आरटीओने ठरवून दिलेल्या नियमानुसार, ना मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा पत्ता, ना गणवेश, रस्त्यावर कुठेही थांबायचे, उलट दादागिरीची भाषा, यामुळे काही बोलायला वावच नाही, अशा शब्दांत चिपळूणमधील नागरिकांमधून रिक्षाचालकांबद्दल सूर उमटू लागला आहे. शहरातील अनेक रिक्षा सीएनजीवर धावत असल्या तरी रिक्षाचे भाडे कमी झालेले नाही. रिक्षाचालकांची प्रवाशांकडून पूर्वीप्रमाणेच लूट सुरू आहे. दुसरीकडे रिक्षाचालकांनी आमचे म्हणणे कुणी ऐकूनच घेत नाही. नुसती कारवाईचीच भाषा केली जाते, अशी भावना व्यक्त केली.
चिपळूण शहरात दुचाकींची संख्या घरोघरी वाढलेली असली तरीही बहुतांश भार रिक्षांवर पडतो. सर्वसामान्य माणूस रिक्षातून प्रवास करत असताना मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही. विचारणा केली तर थातूरमातूर कारणे दिली जातात. गुरुवारी सायंकाळी गणेश कुलकर्णी पागेवरून रिक्षाने चिपळूण बसस्थानकावर आले. रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे भाडे न घेता चक्‍क दीडशे रुपये सांगितले. त्यामुळे रिक्षाचालक आणि कुलकर्णी यांच्यामध्ये तू तू मैं मैं झाली. विशेष म्हणजे सीएनजीवर रिक्षा चालत असताना त्याने दीडशे रुपये सांगितले. त्यामुळे कुलकर्णी यांनी रिक्षाचालकाशी हुज्जत घातली. पूर्वी रिक्षा पेट्रोलवर चालायच्या त्यामुळे जास्त भाडे सांगितले तरी आम्ही ते देत होतो. आता रिक्षा सीएनजीवर चालतात. त्यामुळे रिक्षाचालकांनी भाडे आकारताना विचार केला पाहिजे.
---
कोट
वाढत्या महागाईमुळे आम्हाला प्रवासी वाहतूक परवडत नाही. पेट्रोल आणि सीएनजीच्या दरवाढीवर विचार केला जात नाही. सीएनजी वेळेवर मिळत नाही. पेट्रोल आणि सीएनजीच्या दरात फार फरक नाही. याचा विचार न करता नुसते रिक्षाचालकांवरच कारवाईची भाषा होते. आमच्या समस्याही उपप्रादेशिक परिवहन विभागाने समजून घेऊन त्यावर मार्ग काढला पाहिजे. सीएनजी गॅस कीट बसवण्यासाठी अनुदान द्यावे.
- सूरज चव्हाण, रिक्षाचालक, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com