-राजापुरात रात्री जोरदार पाऊस

-राजापुरात रात्री जोरदार पाऊस

rat०९३०.txt

३० (पान ५ साठी)


-rat९p२३.jpg ः
२३M०१७०८
राजापूर ः पाचल परिसरातील रस्त्यावर साचलेले पाणी.
--
राजापुरात रात्री जोरदार पाऊस

राजापूर, ता. ९ ः तालुक्यात सोमवारी (ता. ९) दिवसभर प्रचंड उकाडा होता. त्यानंतर रात्री अचानक जोरदार पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करत सुमारे तासभर पाऊस झाला.
गेले दोन दिवस तालुक्यामध्ये प्रचंड उष्मा वाढला होता. दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण होते. रात्री १० वा. च्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करत पावसाला सुरवात झाली. सुमारे तासभर पाऊस सुरू होता. जोरदारपणे सुरू असलेल्या या पावसामध्ये वीजही गायब झाली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तालुक्यातील अनेक गावे विजेअभावी अंधारामध्ये होती. पावसाच्या आगमनानंतर रात्री गायब झालेला अनेक गावांमधील वीजपुरवठा मंगळवारी (ता. ९) सकाळी सुरळीत झाली. रात्री झालेल्या पावसाने रात्रभर गारवा होता, पण मंगळवारी दिवसभर कडकडीत ऊन पडल्याने प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले. या पावसाने तालुक्यात कुठेही नुकसान झालेले नाही. सध्या लग्नसराई सुरू असल्याने या पावसाने यजमानांची त्रेधा उडाली. अनेक उभारलेले मंडप भिजल्याने धावपळ झाली. दरम्यान, यावर्षी हापूसचे उत्पादन अर्धेच असल्याने हंगाम अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे झाडावर फारशी फळे राहिलेली नाहीत. त्यामुळे हापूसचे फारसे नुकसान झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com