शाळेसोबत ऋणानुबंध कायम जपा

शाळेसोबत ऋणानुबंध कायम जपा

01734
वेंगुर्ले ः माजी विद्यार्थ्यांनी वेंगुर्ला हायस्कूलला खुर्च्या भेट दिल्या.

शाळेसोबत ऋणानुबंध कायम जपा

एस. एस. काळे; वेंगुर्लेत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ ः शालेय जीवन पूर्ण करून आज विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले ऋणानुबंध आयुष्यभरासाठी जपावेत, अशी साद वेंगुर्ले हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. एस. काळे यांनी विद्यार्थ्यांना घातली. वेंगुर्ले हायस्कूल दहावी १९९७ बॅचच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
वेंगुर्ला हायस्कूलच्या १९९७ मध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यास हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. डी. कांबळे, माजी मुख्याध्यापक काळे, माजी क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर, शिक्षिका शामलता परब, वृंदा कांबळी, शिक्षक रवी थोरात, व्ही. एस. समुद्रे आदी शिक्षक वृंद आणि मुंबई, ठाणे, गोवा, कोल्हापूर आदी विविध ठिकाणांहून बहुसंख्येने आलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते.
हा स्नेहमेळावा दोन सत्रांत झाला. पहिल्या सत्रात वेंगुर्ले हायस्कूल येथे शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तर दुसऱ्या सत्रात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व स्नेहभोजन पार पडले. पहिल्या सत्रात फुलांच्या वर्षावात अनोख्या पद्धतीने शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ‘ती सध्या काय करते’, ‘तो सध्या काय करतो’, या परिचय सत्रात सर्वांनी आपापली ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्यावतीने ऋणानुदान जमवून माजी मुख्याध्यापकांच्या हस्ते शाळेला २५ खुर्च्या आणि तर ५ नारळ रोपे भेट देण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणी जागवत माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामुहिक वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद परब, विनायक वारंग, राजेश्वरी परब उर्फ सायली आंगचेकर, नितीन बांदेकर, प्रशांत परब, हेमंत कांबळी, संजीवनी परब-चव्हाण आदींनी सहकार्य केले. कृष्णदर्शन जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com