
एकच जिद्द, रिफायनरी रद्द
३८ (पान ३ साठीमेन)
-rat९p२५.jpg ः
२३M०१७२८
राजापूर ः रॅलीमध्ये सहभागी ग्रामस्थ.
-rat९p२६.jpg ः
२३M०१७२९
माती परीक्षणासाठी सुरू असलेले ड्रिलिंग.
-----
एकच जिद्द, रिफायनरी रद्द
शिवणे खुर्दमध्ये रॅली ; सर्व आंदोलकांना सोडण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः ‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द'', ‘आमची मागणी मान्य करा.. अमोल बोळेला मुक्त करा’ अशा जोरदार घोषणा देत तालुक्यातील शिवणेखुर्द परिसरातील ग्रामस्थांनी आज गावामध्ये रॅली काढत साऱ्यांचे लक्ष वेधले. या रॅलीच्या माध्यमातून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सर्व आंदोलकांना तत्काळ सोडण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
बारसू सड्यावर माती परीक्षण सुरू असून या परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याला धोपेश्वर, गोवळ, शिवणे परिसरातील ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. माती परीक्षणाच्या कामाला वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलकांकडून विरोध केला जात असून आंदोलक, ग्रामस्थांनी आंदोलनही छेडले आहे.
काही दिवसांपूर्वी रिफायनरीविरोधी संघटनेचे नेते अमोल बोळे यांच्यासह अन्य काही आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावरून ग्रामस्थ, आंदोलक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करावी, तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी गोवळ येथील नवलादेवी मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडले होते. त्यानंतर मंगळवारी (ता. ९) शिवणे खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी गावामध्ये रॅली काढत रिफायनरी हटवण्यासोबतच अटक केलेल्या आंदोलकांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली.