सिंधुदुर्गात मुसळधार

सिंधुदुर्गात मुसळधार

सिंधुदुर्गात मुसळधार
विजांचा कडकडाट; वातावरणातील बदल कायम
वैभववाडी, ता. ९ ः विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी (ता. ८) रात्री मुसळधार पाऊस झाला. काही भागात हलक्या सरी कोसळल्या. वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. घाटपायथ्याच्या गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. आज सकाळीदेखील काही भागात पावसाची रिपरिप सुरू होती. सायकांळी उशिरा जिल्ह्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती.
जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाचे वातावरण होते. सायकांळी पाचच्या सुमारास आंबोली, दोडामार्ग, फोंडा भागात हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण पावसाळी बनले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी शक्यता होती. रात्री नऊच्या सुमारास करुळ घाट पायथ्याच्या गावांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. करुळ, कुंभवडे, सोनाळी, वैभववाडी, भुईबावडा, खांबाळे, फोंडा परिसरात जोरदार पाऊस झाला. करुळ गावामध्ये तर मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये आज पहाटे सहापर्यंत रिपरिप सुरू होती. सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाचे वातावरण होते. रात्री पावणेआठपासून विजांचा कडकडाट सुरू झाला. वैभववाडी तालुक्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत वैभववाडी, फोंडा परिसरातील काही गावांमध्ये पाऊस सुरू होता. पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा संकाटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com