
कलमठ ग्रामपंचायतीतर्फे विकास निविदा
कलमठ ग्रामपंचायतीतर्फे विकास निविदा
कणकवली ः कलमठ (ता.कणकवली) ग्रामपंचायतीतर्फे नोंदणीकृत ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आली आहे. ही निविदा १६ मे पर्यंत सकाळी ११ पर्यंत सादर करावयाची आहे. प्राप्त निविदा ग्रामपंचायत कलमठ कार्यालयात १६ मे रोजी सायंकाळी चारला उघडण्यात येईल. कलमठ सिद्धार्थ कॉलनी स्टेज मंडप बांधणे एक लाख २८ हजार ७२० रुपये निधी मंजूर केला आहे. सिद्धार्थ कॉलनी कांबळे सर घर पायवाट करणे ७५ हजार रुपये, हनुमंत पांचाळ घर ते संजय गुरव घरापर्यंत गटार व संरक्षण भिंत ९९ हजार ९७३ रूपये, कलमठ बाजारपेठ संदीप कांबळी घर ते पालकर गुरुजी घर बंदिस्त गटार करणे एक लाख २५ हजार रूपये, पप्पू कोरगांवकर घर ते विजय पोळघर गटार बांधकाम एक लाख ३९ हजार ९३८ रुपये आणि आचरा रोड ते मुरलीधर साळगांवकर घराकडे (शांतादुर्गा नगर) येथे जाणाऱ्या रस्त्यालगत गटार बांधणे दोन लाख रुपये मंजूर केले आहेत. निविदा अटी व शर्ती ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावले आहेत.
--
वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीचे आवाहन
कणकवली ः वरची गुरामवाडी (ता.मालवण) गावातील विकासकामांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. ग्रामपंचायत मालकीचे व्यापारी गाळा भाडेतत्त्वावर देण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया आहे. ही लीलाव प्रक्रिया १५ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय वरची गुरामवाडी येथे होणार आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेणाऱ्यांकडून रोख रक्कम किंवा डी.डी. स्वीकारला जाणार आहेत. तसेच ग्रामपंचायत वरची गुरामवाडीच्या बहुउद्देशीय सभागृहाला शेटर बसविणेसाठी एक लाख ३५ हजार १८३ रुपये निधी मंजूर आहे. या कामाची निविदा १५ मे पर्यंत स्वीकारली जाणार आहे.
--
01881
प्रदीप प्रभू
प्रदीप प्रभू यांना पुरस्कार जाहीर
वेंगुर्ले ः परुळे बाजार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप प्रभू यांना २०२३ चा कामगार नेते डॉ. दत्ता सामंत सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर झाला. प्रभू हे सहकार आणि सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असून त्यांना यापूर्वी शासन शेती पुरस्कार प्राप्त झाला आहे. २००५ ते २०१२ पर्यंत परुळे बाजार ग्रामपंचायतीचे सदस्य, तर २०१२ ते २०१७ या काळात सरपंच म्हणून कार्यरत असताना ग्रामपंचायतीला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.