
निवृत्त कर्मचाऱ्यांची आज कुडाळला सभा
निवृत्त कर्मचाऱ्यांची
आज कुडाळला सभा
कुडाळ ः भूमिअभिलेख सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. ११) सकाळी अकराला कुडाळ हायस्कूल नजीक मराठा सभागृहात आयोजित केली आहे. सर्वसाधारण सभेस येताना आधार कार्डची प्रत व पासपोर्ट साईज छायाचित्र घेऊन यावे. उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष एम. झेड. गावकर यांनी केले आहे.
................
तोंडवळीत आज
‘पतिव्रतेची पुण्याई’
मालवण ः समस्त पाटील बंधूंतर्फे तोंडवळी येथील श्री देव गांगेश्वर मंदिरात उद्या (ता. ११) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी दहाला महापूजा, दुपारी बारापासून महाप्रसाद, तीनला महिलांसाठी विविध खेळ, रात्री दहाला ग्रामदेवता दशावतार नाट्यमंडळ, बिडवाडी यांचा ‘पतिव्रतेची पुण्याई’ नाट्यप्रयोग होणार आहे.
----
‘सिंधुरत्न’ची आज
मुंबईमध्ये बैठक
कणकवली ः सिंधुरत्न समृद्ध योजना कार्यकारी समितीची बैठक उद्या (ता. ११) सकाळी अकराला समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद, जवाहर भवन, मुंबई येथे आयोजित केली आहे. समितीचे अध्यक्ष तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला समितीचे विशेष निमंत्रित सदस्य माजी आमदार प्रमोद जठार, उद्योगपती किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.
---
साळगावसाठी
विकास निविदा
कणकवली ः साळगाव (ता.कुडाळ) ग्रामपंचायतीतर्फे विकास निविदा जाहीर केली आहे. साळगाव लुभाटवाडी रस्ता मजबुतीसाठी ४ लाख ९९ हजार ९६३ रुपये निधी मंजूर आहे. या कामाची मुदत ३० जानेवारी २०२४ पर्यंत आहे. कामाच्या अटी शर्थींची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात असून मान्यताप्राप्त ठेकेदारांनी १७ मे पर्यंत निविदा बंद लखोट्यातून ग्रामपंचायत कार्यालयात द्यावी.
---
बांदा महाविद्यालयात
विविध अभ्यासक्रम
बांदा ः केंद्राच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून मान्यताप्राप्त विविध अभ्यासक्रमांचे उद्घाटन उद्या (ता. ११) येथील गोगटे वाळके महाविद्यालयात होणार आहे. अकाउंट एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल ड्रासमन, प्लंबिंग हे मोफत प्रशिक्षण वर्ग महाविद्यालयात सुरू केले आहेत. उद्घाटन समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग यांनी केले आहे.