Tue, October 3, 2023

‘एनएमएमएस’मध्ये कासार्डे विद्यालयाचे यश
‘एनएमएमएस’मध्ये कासार्डे विद्यालयाचे यश
Published on : 10 May 2023, 12:03 pm
‘एनएमएमएस’मध्ये कासार्डे विद्यालयाचे यश
कणकवली ः राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या एनएमएमएस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या आठवीतील वैदेही राणे व वेदिका तेली या विद्यार्थिनींनी यश संपादन करीत शिष्यवृत्ती प्राप्त केली. या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती विभागप्रमुख डी. डी. मिठबावकर, एस. डी. भोसले, आर. एस. खटावकर व पी. वाय. सुतार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थिनींचे स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समिती चेअरमन अरविंद कुडतरकर, माजी कार्याध्यक्ष तथा स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी प्रभाकर कुडतडकर, प्राचार्य एम. डी. खाडये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.