लांजा बाजारपेठेत बेशिस्त पार्किंगमुळे पादचाऱ्यांना त्रास

लांजा बाजारपेठेत बेशिस्त पार्किंगमुळे पादचाऱ्यांना त्रास

बेशिस्त पार्किंगमुळे लांजा
बाजारपेठेत नागरिकांना त्रास
आठवडा बाजाराला प्रचंड गर्दी; कारवाईची मागणी
लांजा, ता. १०ः शहरात दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शहरातील आठवडा बाजार महामार्गाशेजारी भरत असल्याने बाजारादिवशी रस्त्यावर वाहने आणि नागरिकांची गर्दी होते. त्यातच वाहनांचे बेशिस्त पार्किंग केल्याने व्यापारी आणि नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.
आठवडा बाजारासाठी बाहेरून येणारे व्यापारी हे महामार्गालगतच दुकाने लावतात. तालुक्यातून बाजार खरेदी करायला येणारे नागरिक महामार्गावरच खरेदी करतात. त्यातच मोकाट गुरे काही खायला मिळेल याच्यासाठी गर्दीत घुसतात. त्यामुळे बाजारातील बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लांजा पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस आणि होमगार्ड उपलब्ध असतात. परंतु ते उपलब्ध असूनही योग्य नियमन होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आठवडा बाजारात मुंबई-गोवा महामार्गावर साधारणतः भूमिअभिलेख कार्यालयापासून ते कोर्ले फाटापर्यंत रस्त्यालगत दुकाने आणि नागरिकांची वर्दळ असते. त्याठिकाणी योग्य नियमन होणे गरजेचे आहे. यासाठी वाहतूक पोलिस आणि होमगार्ड यांनी एका जागेवर न थांबता बाजारपेठेत फिरून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करुन चाप बसविणे आवश्यक आहे.
महामार्गावर रस्त्यालगत वाहने उभी करणे, रस्त्यावर उभारलेल्या पिलरचा जवळ वाहने उभी करणे, रस्त्याचा मधोमध एसटी बसस्थानक समोरील जागेत तासनतास वाहने उभी करणे, बाजारपेठेत पेट्रोल पंपासमोरील जागेत वेडेवाकडे पार्किंग करणे, नगरपंचायतीसमोर महामार्गावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com