टेरव गाव कचरामुक्त व प्रदूषण मुक्तचा संकल्प

टेरव गाव कचरामुक्त व प्रदूषण मुक्तचा संकल्प

११ (टुडे पान ४ साठी)


- rat९p६.jpg-
२३M०१६२०
श्री भवानी वाघजाई
---------

टेरव गावाचा कचरा, प्रदूषण मुक्तचा संकल्प

वाघजाई मंदिर वर्धापन दिन ः शून्य कचरा मोहीमेसाठी जनजागृती

चिपळूण, ता. १० ः श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई शक्तीपिठाचा बारावा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (ता. ८) मे उत्साहात पार पडला. या निमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शून्य कचरा मोहीम राबवून टेरव गाव कचरामुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.
श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिराच्या नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर या नूतन मंदिराचे उद्घाटन व कलशारोहण श्रीमंत जगद्गुरू शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते आणि भारती महाराज, आळंदी देवाची यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सकाळी देवतांना अभ्यंगस्नान, अभिषक, नवचंडी याग, दुपारी महाआरती, महाप्रसाद, हळदीकुंकू व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री हरिपाठ व महाआरती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या वर्धापनदिनी आमदार शेखर निकम, अनेक मान्यवर तसेच माहेरवाशिणी, भाविकांनी सहपरिवार, मित्रमंडळींसह अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. या निमित्त शून्य कचरा मोहीम राबवून टेरव गाव कचरामुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. शाळा, धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे प्रकार व त्याची विल्हेवाट कशी लावावी, अवैध वृक्षतोड, वणवा, वन्यप्राण्यांची शिकार, रासायनिक खते, पाण्याचा अपव्यय, थर्माकोल व प्लास्टिकचा वापर या वर इतर अनेक बाबी का व कशा टाळाव्यात याबाबत जनजागृती करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेची सुरवात गावातील शाळा, धार्मिक स्थळे, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या जमा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावून करण्यात येणार आहे.
-----
१८३९ ला प्रथमच जीर्णोद्धार
आदिशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी जगदंबा माता, आबालवृद्धांचे श्रद्धास्थान, महाराष्ट्राचे कुलदैवत आणि ग्रामदैवत श्री वाघजाई मातेसह इतर देवतांची स्थापना अंदाजे ५०० वर्षापूर्वी १५१० ते १२ या काळात टेरवमध्ये करण्यात आली. हिरव्यागार देवरहाटीमध्ये वसलेल्या या मंदिराची दुरवस्था झाल्यामुळे १८३९ ला या मंदिरांचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झाल्याची इतिहासात नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com