शिवानीचा सत्कार

शिवानीचा सत्कार

२३ (पान २ साठी, संक्षिप्त)


-rat९p१८.jpg-
२३M०१६५८
रत्नागिरी : जागुष्टे हायस्कूलमध्ये शिवानी पटवर्धन हिचा सत्कार करताना लोवलेकर. सोबत डॉ. राजीव सप्रे, पूजा कात्रे आदी.
------

जागुष्टे हायस्कूलमध्ये शिवानीचा सत्कार

रत्नागिरी, ता. ९ ः ऑलिम्पियाड गणित स्पर्धा परीक्षेतील सुवर्णपदक विजेत्या शिवानी धनंजय पटवर्धन हिचा रा. गो. जागुष्टे हायस्कूलमध्ये नुकताच सत्कार करण्यात आला. या परीक्षेला बसलेल्या आठवी आणि दहावीमधील सर्व २३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहेत. त्या प्रमाणपत्रांचे वितरणही या समारंभप्रसंगी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लोवलेकर यांनी विद्यार्थ्यांचा कौतुक केले आणि भविष्यकाळात अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर कष्ट घेऊन अभ्यास करून यशस्वी व्हा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. विज्ञान विषयाच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन हवे असल्यास मार्गदर्शन करण्याचा मानस व्यक्त केला. ऑलिम्पियाड गणित स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करणारे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे गणित विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. राजीव सप्रे यांनी सांगितले की, शिवानी पटवर्धन या विद्यार्थिनीने ऑलिम्पियाड गणित स्पर्धा परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवून उत्तम यश मिळवण्याची परंपरा सुरू केली. ती परंपरा पुढील विद्यार्थ्यांनी तिच्याकडून प्रेरणा घेऊन अखंड चालू ठेवावी. मुख्याध्यापिका पूजा कात्रे म्हणाल्या की, शिवानीने पुढेही वारकऱ्यांसारखी आपली गणिती ज्ञानवारी अखंड चालू ठेवावी, अशी इच्छा व्यक्त करत शिवानीला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
------

रत्नागिरी जिल्ह्यात सहा ठिकाणी रक्तदान

रत्नागिरी : श्री अनिरुद्ध आदेश पथक, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरुद्ध समर्पण पथक या संस्थांच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. अनिरुद्ध जोशी (एमडी मेडिसिन, सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू) यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या संस्थांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये शिबिरे घेतली. यात १५,२६१ पिशव्या इतके रक्त संकलित करण्यात आले. याचा १०० हून जास्त ब्लड बँकांनी लाभ घेतला. जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी झालेल्या महारक्तदान शिबिरात ३२६ इतके पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात रक्तपेढ्यांना रक्ताचा मोठा तुटवडा जाणवतो. मुंबईसह महाराष्ट्राच्या रक्तपेढ्यांमध्ये अपेक्षेहूनही फारच कमी युनिट्स शिल्लक रहिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com