Wed, Sept 27, 2023

दापोलीत पाऊस
दापोलीत पाऊस
Published on : 10 May 2023, 10:44 am
३६ (टुडे पान ४ साठी, संक्षिप्त)
दापोलीत तासभर पाऊस
दाभोळ ः दापोली शहर व परिसरात मंगळवारी (ता. ९) पहाटे एक तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने हवेत गारवा पसरला असून या पावसाचा परिणाम आंबापिकावर होणार असल्याने बागायतदारांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. आज सकाळी ५.३० ते ६.३० दरम्यान जोरदार पाऊस पडल्याने अनेकांची चांगलीच धावपळ उडाली होती. कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागात ३१.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, यावर्षी आधीच आंबा कमी असून त्यातच हा अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.