ओटवच्या लघू प्रकल्पासाठी
९९.४९ कोटींचा निधी मंजूर

ओटवच्या लघू प्रकल्पासाठी ९९.४९ कोटींचा निधी मंजूर

ओटवच्या लघू प्रकल्पासाठी
९९.४९ कोटींचा निधी मंजूर
कणकवली, ता. १० ः ओटव (ता.कणकवली) लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या ९९.४९ कोटी रुपये किंमतीच्या कामाला चतुर्थ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ७.५५ द. ल. घ. मी. एवढा पाणीसाठा होणार असून ओटव व नांदगाव भागातील ५१८ हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार आहे.
या प्रकल्पाला २००५-०६ मध्ये २५.०२ कोटी रुपये खर्चाची तृतीय प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तर २०१२-१३ मध्ये ७९.७९ एवढ्या खर्चाची चतुर्थ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आता ती सुधारीत करण्यात आली असून ९९.४९ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर असे प्रकल्प होण्याची नितांत आवश्यकता आहे. तरच जिल्ह्यातील शेती टिकेल. शेतकऱ्यांना रोजी रोटी मिळेल. ओटव येथील प्रकल्पही तसा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा आहे. प्रकल्पात होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे ओटव व नांदगाव भागातील शेती ओलिताखाली येणार आहे. परिणामी तेथील उत्पन्नवाढीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. आता तब्बल ९९.४९ कोटी निधी मंजूर झाल्याने स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com