आरटीई प्रवेशासाठी 15 पर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी 15 पर्यंत मुदतवाढ

१६ (पान ५ साठी)

आरटीई प्रवेशासाठी १५ पर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी, ता. १० ः राज्यात शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी राबवण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीकडे दुर्लक्ष केल्याने ५० टक्के जागा रिक्त आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशप्रक्रियेला दुसऱ्‍यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता १५ मेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
जिल्ह्यात ७२५ जणांपैकी ५०६ जणांनी प्रवेश निश्चित केला आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ८ हजार ८२३ खासगी शाळांमधील १ लाख १ हजार ८४६ जागांसाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहेत. त्याकरिता ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा सोडतीत केली आहे. सोमवारी (ता. ८) सायंकाळपर्यंत ५० हजार ३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ५१ हजार ८४३ जागा अद्यापही रिक्त आहेत. दरम्यान, प्रतीक्षा यादीत ८१ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात ९२९ जागेसाठी १ हजार १०६ अर्ज आले होते. त्यापैकी ७२५ जणांना लॉटरी लागली होती. आतापर्यंत ५०६ जणांनी प्रवेश निश्चित केला आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आता अ‍ॅडमिट कार्डची प्रिंट काढू नये. या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाल्यानंतर आरटीई पोर्टलवर अधिकृत सूचना देण्यात येतील. एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच प्रिंट काढण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com