Mon, Sept 25, 2023

तंबू चालकांची उद्या
शिरोड्यात बैठक
तंबू चालकांची उद्या शिरोड्यात बैठक
Published on : 10 May 2023, 12:03 pm
तंबू चालकांची उद्या
शिरोड्यात बैठक
वेंगुर्ले,ता.१० ः शासनाने अकृषक कर लादल्याने संतप्त झालेल्या तंबू चालक-मालकांची बैठक शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी चारला शिरोडा वेळागर सर्व्हे नं. ३९ येथे संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी अकृषक कराबरोबरच जिल्हा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर विकास आराखडा अनुषंगाने चर्चा होणार आहे. न्यास न्याहारी योजनेंतर्गत बांधलेल्या तंबूंना ५० टक्के अनुदान अद्याप न मिळाल्याने त्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासाठी चर्चा होणार आहे. सिंधुदुर्ग पर्यटन कार्यालय सक्षमपणे काम करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी असून यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. सर्व तंबू चालक, मालकांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष चमणकर व सचिव नामदेव भुते यांनी केले आहे.