जीर्णोद्धार सोहळ्याने साळिस्ते भक्तिमय

जीर्णोद्धार सोहळ्याने साळिस्ते भक्तिमय

01968
साळिस्ते ः येथील श्री देव खांबेश्वर, विठ्ठलादेवी देवतांचे भक्तिमय वातावरणात मिरवणुकीने आगमन झाले. (छायाचित्र ः आनंद मणचेकर)


जीर्णोद्धार सोहळ्याने साळिस्ते भक्तिमय

देवतांचे मिरवणुकीने आगमन; आज कलशारोहण, प्रतिष्ठापना

तळेरे, ता. १० : साळिस्तेचे ग्रामदैवत श्री देव खांबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पुनःप्रतिष्ठापना सोहळ्याला सोमवारी (ता. ८) उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सोमवारी सायंकाळी ढोलताशांच्या गजरात व जयघोषात देवतांचे आगमन झाले. मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री मठ संस्थान दाभोली येथील श्रीमद् दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते उद्या (ता. ११) होणार आहे.
सोमवारी सकाळी प्रायश्चित विधी व रुद्रयाग, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने देवतांचे आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने सजावट केलेल्या बैलगाडीने फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात भक्तिपूर्ण वातावरणात साळिस्ते सीमेवरून मंदिरापर्यंत देवतांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये ग्रामस्थ, मुंबई स्थित चाकरमानी आणि माहेरवाशिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मिरवणुकीचे प्रत्येक वाडीत स्वागत करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान लाठीकाठीचा कार्यक्रमही झाला. उद्या सकाळी सातला मंगलाचरण, प्रकारशुद्धा, आवाहित देवतांची पूजा, अग्निअर्चन, तत्वहोम, सकाळी ८.५० ला श्रीमद् दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. त्यानंतर ९.३२ ला मूर्तिप्रतिष्ठापना, पूर्वक प्राणप्रतिष्ठापना, देवतांची महापूजा, महाबलिदान, महापूर्णाहुती, प्रतिष्ठा उत्तरांग विधी, अभिषेक, विभूतीवंदन, देवालय उत्सर्ग कर्म समाप्ती, दुपारी एकला महाआरती, गाऱ्हाणे, दोनला महाप्रसाद, चारला देवीची ओटी भरणे, हळदीकुंकू, सायंकाळी चारला मान्यवरांचा सत्कार, रात्री आठला महाप्रसाद, नऊला बुवा उदय पारकर व बुवा संतोष मिराशी यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com