
कळसुली येथे स्वामी समर्थ मूर्ती स्थापना कलशारोहण
कळसुली येथे स्वामी समर्थ
मूर्ती स्थापना कलशारोहण
शनिवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली,ता. १३ ः प्रेमदया प्रतिष्ठान (मुंबई) व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली (हर्डी) यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली हर्डी येथे श्री स्वार्मी समर्थ महाराजांचे मंदिर बांधले आहे. या मंदिरामध्ये १३ ते १५ मे या कालावधीत श्री स्वामींची मुर्ती स्थापना, कलशारोहण आणि पादुका पूजन सोहळा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यावेळी शनिवारी (ता.१३) सायंकाळी चारला श्री स्वामी समर्थ पालखी दिंडी सोहळा, त्यांनतर हरीपाठ पठन व प्रवचन, रात्री आठला कीर्तन, रात्री दहाला ‘विधीलेख’ महिला दशावतार नाटक सादर होणार आहे. रविवारी (ता.१४) सकाळी सातला गणपती पूण्याहवाचन, देवता स्थापना, सकाळी दहाला अग्नीस्थापना, गृहयज्ञ मुख्य हवन व धार्मिक कार्यक्रम, दुपारी एक वाजता महाप्रसाद, सायंकाळी तीन वाजात स्थानिक परिसरातील भजने, त्यानंतर हरिपाठ पठन व प्रवचन, कीर्तन, रात्री साडेनऊला ‘प्रयागतिर्थ’ दशावतारी नाटक सादर होणार आहे. सोमवारी (ता.१५) सकाळी देवता पूजन, कलशारोहण, मुर्ती मुहुर्त प्राण प्रतिष्ठापना, पादुका स्थापना आणि दुपारी महाप्रसाद वाटप होईल. त्यानंतर भजने, हरीपाठ व कीर्तन, सायंकाळी सातला संगीत रजनी कार्यक्रम, महिलांचा फुगडी कार्यक्रम, रात्री दहा वाजता डबलबारी सामना बुवा विनोद चव्हाण-सुशील गोठणकर यांच्या होणार आहे. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मठ, कळसुलीचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.