रेल्वेस्टेशन येथे अंमली पदार्थ तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

रेल्वेस्टेशन येथे अंमली पदार्थ तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

२४ ( पान ३ साठी )

रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर ब्राऊन हेरॉईन जप्त

तस्करी करणाऱ्याला हथकड्या ; १२.८ ग्रॅमचा अमंली पदार्था जप्त


रत्नागिरी, ता. १० ः रत्नागिरी रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्म नं. १ वर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आवळल्या. मोहसिन अब्दुल गणी शेख (३६, रा. चर्चरोड मच्छिमार्केट, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. ९) निदर्शनास आला. संशयिताकडून टर्की पावडर असलेल्या एकूण ४५० कागदी पुड्या मिळून आल्या. त्याची प्राथमिक रासायनिक तपासणी केली असता त्यामध्ये १२.८ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून आला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
पोलिसांनी दिलेली माहिती, मागील काही दिवसात जिल्ह्यात काही तरुण अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी शहरात अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या.
या पथकामार्फत अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्याबाबत गोपनीय माहिती घेण्याचे काम सुरू होते. मंगळवारी शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमलदार शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यांना रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म नं.१ वरून पार्सल गेटने पार्किंगकडे एक तरुण जाताना त्यांना दिसून आला. त्याच्या पाठीवर सॅक होती. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली. तेव्हा त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ५ पारदर्शक प्लास्टिक पिशव्या मिळून आल्या. त्यात ४५० टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या होत्या. त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रसाद घोसाळे, गणेश सावंत, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, पोलिस नाईक आशिष भालेकर, विनय मनवाल आणि रत्नकांत शिंदे यांनी केली.
---------
पोलिसांनाच चकवा देण्याचा प्रयत्न
रल्वेस्टेशन परिसरात येणाऱ्या संशयितांनी पोलिसांना चकवा देण्याचा खूप प्रयत्न केला. रेल्वेच्या तीन-चार गाड्या त्याने सोडल्या; मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून संशयित सुटला नाही. त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com