परशुराम घाटातील प्रवास सुलभ करण्याचा प्रय़त्न

परशुराम घाटातील प्रवास सुलभ करण्याचा प्रय़त्न

२९ (पान ३ साठीमेन)


-rat१०p१०.jpg ः
२३M०२००२
चिपळूण ः परशुराम घाटात मातीचा भराव टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
-rat१०p११.jpg ः
२३M०२००३
घाटातील धोकादायक वळणे काढण्यात आली आहेत.
(मुझफ्फर खान ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------------

आजपासून परशुराम घाटातील वाहतूक नियमित

प्रवास सुलभ करण्याचा प्रयत्न ; सात मिनिटात घाट होणार पार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट गुरुवारपासून (ता. ११) नियमित चालू होणार आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे. घाटातील डोंगरकटाई आणि खोल भागात मातीचा भराव करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे घाटातील प्रवास आता सुलभ झाला आहे. पूर्वी घाटरस्त्यातून प्रवास करण्यासाठी १२ ते १५ मिनिटे लागत होती. आता ७ ते ८ मिनिटात तो पूर्ण होणार आहे.
परशुराम घाटातील वाहतूक गेले १५ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. घाटातील धोकादायक डोंगरकटाई ९० टक्के संपली आहे. अवघड वळणाच्या ठिकाणी भरावाच्या कामासाठी हा घाट १५ दिवस बंद ठेवण्याची मागणी कल्याण टोलवेज कंपनीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्याला प्रशासनाकडून मंजुरी मिळाली. त्यामुळे २५ एप्रिल ते १० मे या कालावधीत दुपारी १२ ते सायं. ५ वाजेपर्यंत हा घाट बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील तब्बल १०० हून अधिक बसफेऱ्या रद्द केल्याने ऐन सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय झाली होती. या फेऱ्या गुरूवारी सुरू होणार आहेत. लोटे एमआयडीसीत कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना घेऊन येणाऱ्या कंपनीच्या बसही आता सुरू होणार आहेत.
नैसर्गिक आपत्ती वगळता घाटातील सर्व धोके कमी करण्याचा प्रयत्न कल्याण टोलवेज कंपनीने केला आहे. बुधवारी पहाटे अवकाळी पाऊस झाला. या वेळी घाटात भरावाची मात रस्त्यावर येऊन रस्ता चिखलमय झाल्यामुळे घाटातील वाहतूक सात तास बंद ठेवण्यात आली होती. अवकाळी पावसामुळे महामार्ग विभागाला जादा प्रय़त्न करावे लागले.
-
चौकट
नागमोडी वळणे काढण्यात आली
दापोली, खे़ड, मंडणगडकडील प्रवाशाना घाटबंदीचा त्रास सहन करावा लागला. हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस-चिपळूणमार्गे वळवण्यात आली तरी या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत होती. घाटात अनेक ठिकाणी नागमोडी वळणे होती. या वळणावर येणारी वाहने समजत नसल्यामुळे अपघात होत होते. चौपदरीकरणात ही वळणे काढण्यात आली आहेत. एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.

चौकट
दरडी कोसळण्याचा धोका

पावसात भरावाची माती रस्त्यावर येऊन घाटातील रस्ता चिखलमय झाला होता. डोंगरकटाईनंतर परशुराम घाटात दरडी कोसळण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरावरील मात खाली येऊन नैसर्गिक संकट निर्माण झाल्यास घाटातील वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची भिती आहे.
----------
कोट
परशुराम घाटातील धोकादायक वळणे काढण्यात आली आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक संकट निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यातूनही जर नैसर्गिक संकट निर्माण झाले तरी लवकरात लवकर रस्ता चालू करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
- अमोल माडकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com