भोसले नॉलेज सिटीचे 
कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये यश

भोसले नॉलेज सिटीचे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये यश

01992
सावंतवाडी ः कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये यश मिळविलेले भोसले नॉलेज सिटीचे विद्यार्थी.

भोसले नॉलेज सिटीचे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये यश
सावंतवाडी ः येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये देशातील आघाडीची औषध कंपनी सिप्ला फार्मास्युटिकल्सतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले. कंपनीच्या गोवा येथील औषध प्रकल्पांसाठी या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या २५ विद्यार्थ्यांची तसेच यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या १४ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली. कंपनी गेली पाच वर्षे नियमितपणे हे कॅम्पस इंटरव्हयू घेत असून यामध्ये भोसले नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांचे निवड होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप, पॉलिटेक्निक प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले.
...............
आचऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रम
आचरा ः आचरा-पारवाडी येथील जाधव घराण्याचा त्रैवार्षिक होम पूजन (घराण्याचा आकार देवाची प्रतिष्ठापना) कार्यक्रम उद्या (ता. ११) साजरा होणार आहे. यानिमित्त शुक्रवारी (ता. १२) तुळजा भवानीचा गोंधळ व जागरण उत्सव, चौंडेश्वरी देवीचे पूजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com