चिपळूण-क्राईम

चिपळूण-क्राईम

क्र. ३५ (पान ३ साठी, क्राईम)

संशयिताला जामीन मंजूर

चिपळूण ः शहरातील दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून चिपळूण पोलिसांनी काही तासात अटक केलेल्या संशयित अजय कृष्णा कदम याला चिपळूण न्यायालयाने जामीन मंजूर केला. शहरातील खेंड येथील एकाची दुचाकी रविवारी (ता. ७) दुपारी चोरीस गेली होती. याबाबत त्यांनी तत्काळ चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितावर कारवाई केली. न्यालयाने त्याचा १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले.
---

रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

खेड ः कोकण रेल्वे मार्गावरून कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाचा पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ८) मध्यरात्री एकच्या सुमारास पेण ते वडखळदरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबधिताची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावरून आवाहन केले होते. मृत तरुणाच्या खिशात दादर ते खेड असे तिकीट आढळले होते. हा तरुण खेड, दापोली, मंडणगड येथील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या तरुणाची ओळख पटलेली असून त्याचे नाव विनायक विकास शिंदे (रा. रा. चेंबूर मुंबई, मूळ रा. घेरा सुमारगड, ता. खेड) असून त्याची आई, वडील यांना घटनेबाबत माहिती देऊन त्यांना वडखळ पोलिस ठाणे येथे नेऊन मृतदेह ताब्यात देण्यात आला.
----

झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू

खेड ः तालुक्यातील भिलारे गावातील खोंडेवाडी येथील जितेश बाळाराम जाबरे (वय २८) हा तरुण आंब्याच्या झाडावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. ही घटना मंगळवारी (ता. ९) घडली. जितेश जाबरे याला उपचारासाठी कळंबणीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com