
निवतीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
निवतीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः श्री साई निवती मेढा ग्रामस्थ मंडळातर्फे तेथील साईबाबा मंदिराचा २० वा वर्धापनदिन सोहळा १३ ते १५ मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. १३ ला पहाटे साईबाबा मूर्तीला अभ्यंगस्नान, लघुरुद्र, पूजा, सकाळी हरिपाठ, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी पादुका मिरवणूक व दिंडी सोहळा, रात्री भजने, १४ ला सकाळी हरिपाठ, दुपारी श्रींची महापूजा, सायंकाळी हरिओम सांप्रदायिक महिला भजन मंडळ निवती यांचे भजन, गणेश वारकरी महिला भजन मंडळ निवती यांचे भजन, रात्री १० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग ''ब्रह्मांडनायक,'' १५ ला पहाटे काकड आरती, सकाळी हरिपाठ, दुपारी साईभंडारा व महाप्रसाद, सायंकाळी भजने, रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
--
पिकुळेत उद्या वर्धापन सोहळा
दोडामार्ग ः पिकुळे-शेळपीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (ता. १२) साजरा करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता महाअभिषेक, ११ वाजता श्रींची महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भजन, रात्री १० वाजता श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्यमंडळ, पिकुळे यांचा ‘प्रारब्ध’ अर्थात ‘सोमेश्वर लिंग स्थापना’ हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
--
आडवणला उद्या ‘राजा खटवांग’
मालवण ः आडवण-देऊळवाडा येथे चव्हाण कुटुंबीयांतर्फे उद्या (ता. ११) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त त्रैवार्षिक श्रींच्या महापूजेसह आरती, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी (ता. १२) रात्री ९ वाजता श्री सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, कसई-दोडामार्ग यांचा ‘कृष्ण-हनुमान युद्ध’ अर्थात ‘राजा खटवांग’ नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
------------------
परमे नदीमधील गाळ उपसा सुरू
दोडामार्ग ः परमे येथील नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचा प्रारंभ सरपंच प्रथमेश मणेरीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संतोष गावडे, झिलू बिर्जे, मनोहर बिर्जे, सुभाष गावडे, सुनील नाईक, भिवा गवस, बाबी गावडे, राजू घोगळे, इतर ग्रामस्थ आणि यांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.