विभागीय आयुक्तांकडून खेड बीडीओंच्या चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभागीय आयुक्तांकडून खेड बीडीओंच्या चौकशीचे आदेश
विभागीय आयुक्तांकडून खेड बीडीओंच्या चौकशीचे आदेश

विभागीय आयुक्तांकडून खेड बीडीओंच्या चौकशीचे आदेश

sakal_logo
By

३६ ( पान ३ साठी)

खेड बीडीओंच्या चौकशीचे आदेश

उदय बोरकर ; बोरघर ग्रामपंचायतीत कर्मचारी नेमणूक ; चौकशीची मागणी

खेड, ता. ११ : तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायतमध्ये अनधिकृत कर्मचारी नेमणुकीबाबत माजी सरपंच तथा खेड भाजपाचे ज्येष्ठ नेते उदय बोरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे गट विकास अधिकारी यांच्या कारभाराबाबत चौकशी करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती उदय बोरकर यांनी दिली.
बोरकर यांचे तक्रारीनुसार, बोरघर ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती धारा किरण बोरकर यांनी गटविकास अधिकारी दिघे यांच्याकडे बोरघर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सुजाता नामदेव शेलार यांचे कामकाजाबद्दल तसेच लॉकडाऊन काळात नियमबाह्यय केलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी नेमणुकीबाबत अनेकवेळा तक्रार केली. पण कोणतीच कारवाई न करता ग्रामसेवक शेलार यांची पाठराखण केली, असा आक्षेप घेतला होता. ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०२० या दरम्यान बोरघर ग्रामपंचायतीचे उदय बोरकर हे सदस्य होते. सदर कालावधीत ग्रामपंचायतीत कोणतीही कर्मचारी पदाची अथवा शिपाईपदाची भरती केली गेलेली नाही. तेव्हाच्या सरपंच आणि विद्यमान सरपंच या दोन्हीकडून कोणत्याही प्रकारचे नियुक्तीपत्र अजित नारायण कदम यांना दिलेले नाही. सदर कर्मचारी तात्पुरता दोन/तीन महिन्यासांठी कोरोना कालावधीत मदतीसाठी रोजंदारीवर नेमलेला होता. कोरोना कालावधीत शासनाचे अथवा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होईल असा कोणताही निर्णय तेंव्हाच्या सदस्यानी घेतलेला नाही. अथवा कोणतीही पदभरतीची कार्यवाही केलेली नाही. परंतु, ग्रामपंचायतीची मुदत संपल्यावर व पंचायतीवर प्रशासकीय कारभार आल्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून शिपाई भरती केल्याचे भासविले आहे.
परंतु त्यावर गटविकास अधिकारी दिघे यांनी कोणतीच कारवाई केली नाही. या सगळया गोष्टी त्यांच्या नजरेस आणल्यानंतरही कर्मचाऱ्याचा पगार शासनाकडून मिळवून देऊन या प्रकरणात सहकार्य केले. त्यामुळे गटविकास अधिकारी दिघे यांची सखोल चौकशी होवून कारवाई होण्यासाठी बोरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशी करण्याचे आदेश आले असल्याचे बोरकर यांनी पत्रकारांना सांगितले.