नीलेश सुर्वे यांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

नीलेश सुर्वे यांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

१४ (टुडे पान ४ साठी)

नीलेश सुर्वेंची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड ; भाजपमध्ये उत्साह

गुहागर, ता. ११ ः रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांची महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
सुर्वे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुखापासुनच कामाला सुरवात केली. २००९ नंतर पक्षाच्या कठीण काळात भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले. संघटन कौशल्याबरोबरच निवडणुकांची जबाबदारी घेऊन त्यात पक्षाला यश देण्यात ते भाजप तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वी झाले आहेत. आज त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करून पक्षाने गौरवले आहे. त्याच्या निवडीने भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या पदाचा वापर जनसामान्यांची अनेक कामे मार्गी लावण्यासाठी करेन. भाजपचे पक्ष संघटन मजबूत करणे आणि आगामी गुहागर पंचायत समिती व नगर पंचायत, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप-सेना युतीचा भगवा फडकवणे हे आमचे लक्ष्य आहे. या उद्दिष्टांपर्यंत पोचण्यासाठी या निवडीने उत्साह व आत्मविश्वास मिळाला आहे, असे सुर्वे यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी शुभेच्छा देताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीसाठी याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com