''एनएमएमएस'' परीक्षेत पाट विद्यालयाचे यश

''एनएमएमएस'' परीक्षेत पाट विद्यालयाचे यश

‘एनएमएमएस’मध्ये पाट विद्यालयाचे यश
कुडाळः राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) एस. एल. देसाई विद्यालय, पाटच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यातील ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यामध्ये तन्मय गोसावी, जयेश निर्गुण, दिनार मयेकर, यश मांजरेकर, मयूर परब, जयवंत कुडव, धनश्री पाटकर, रसिका झाड, पुष्पराज परब, संचिता राऊत, सुश्रुषा परब या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांनी अभिनंदन केले. प्रशालेतील नंदिनी बुरुड, प्रगती निवतकर, दीपिका सामंत, सिद्धी चव्हाण, विनायक कांबळे, मारुती सांगळे, सयाजी बोंदर, आनंदा हाके, प्रशांत चव्हाण या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
.................
कुसबे परिसरात कामांची भूमिपूजने
कुडाळः खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुसबे, पोखरण, कसाल या गावांत मंजूर झालेल्या ५१ लाख रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने मंगळवारी (ता. ९) करण्यात आली. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही खासदार राऊत, आमदार नाईक यांनी दिली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हा संघटक जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, शाखा प्रमुख राजू घाडीगावकर, कुसबे सरपंच समीक्षा जाधव, उपसरपंच भाग्यश्री घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य विजय म्हाडेश्वर, आबा मुंज, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
....................
उसप परिसराला अवकाळीचा फटका
दोडामार्गः तालुक्यात बुधवारी (ता. १०) झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. भले मोठे आंब्याचे वृक्ष उसप धुरीवाडा येथे रस्त्यावर पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पाऊस ओसरताच तेथील स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत कटर मशिनच्या सहाय्याने ते झाड कापून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
...................
तळेखोलला रविवारी जन्मोत्सव सोहळा
दोडामार्गः शिवजयंती उत्सव समिती तळेखोलतर्फे श्री राष्ट्रोळी महाविष्णू सभामंडप, वाटुळवाडी-तळेखोल येथे रविवारी (ता. १४) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त सायंकाळी ७ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, प्रमुख वक्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्गचे प्रमुख मंगेश पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे. उद्घाटक म्हणून दोडामार्गचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी तसेच पत्रकार राघोबा पेडणेकर, तळेखोल सरपंच वंदना सावंत, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सगुण मोरजकर उपस्थित राहणार आहेत. रात्री ८.३० वाजता महापुरुष दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी यांचा ''कृष्ण परतुनी येई गोकुळी'' सादर होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले
..........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com