
सावर्डेत विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे आज उदघाटन
.९ (टुडे पान ४ साठी)
सावर्डेत विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे आज उदघाटन
चिपळूण, ता. ११ ः तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांचे प्रदर्शन शुक्रवारी १२ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. १२ मे रोजी सकाळी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ११ ते ५ दरम्यान हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
सह्याद्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले व प्रा. एस. आर. देवरूखकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने सिव्हिल विभागाने तांदळाचा भुसा वापरून तयार केलेले पेव्हरब्लॉक, बांबूचा उपयोग सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मजबुतीकरण सामुग्री, पेव्हरब्लॉकमध्ये फ्लाय अॅश आणि प्लास्टिकचा वापर, टाकाऊ लॅटराइट दगडाने खडबडीत एकंदर आंशिक बदलून काँक्रिटच्या संकुचित शक्तीचा अभ्यास, ग्रीन बिल्डिंगचे प्रकल्प आहेत तर मेकॅनिकल डिपार्टमेंटकडून सांडपाणी गुरूत्वाकर्षण ठिबक सिंचन प्रणाली, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक हॅंडिकॅप ट्राय-सायकल, डिजिटल डिस्प्ले, वॉटर प्युरिफायर, बॅबकॉक आणि विलकॉक्स बॉयलर, इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे डिजिटल अग्निशमन ट्रक, सौरऊर्जेवर चालणारी कचरा विल्हेवाट, अल्ट्रासोनिक अंतर मोजमाप, मोबाईल कंट्रोलसह डिस्प्ले, फिंगरप्रिंट दरवाजा लॉक, स्मार्ट मिनी इलेक्ट्रॉनिक रेफ्रिजरेटर, अपघात अलर्ट ऑटोमेशन, अपघात प्रतिबंध प्रणाली, पाणीपातळी प्रणाली, अल्ट्रासोनिक ब्लाइंड स्टिक, अँटीस्लीप अलार्म, आरएफआयडी कार्ड वापरून स्वयंचलित टोल टॅक्स, संगणक विभागाचे वैद्यकीय सूचना अॅप, ग्रंथालय व्यवस्थापन ऑनलाइन लायब्ररी व्यवस्थापन, ब्लॉगिंग वेबसाइट, क्विझ व्यवस्थापन प्रोजेक्ट, क्लिनिक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम, ज्वेलरी शॉप व्यवस्थापन, ई-कॉमर्स वेबसाईट, कॉलेज वेबसाईट, मेडिकल स्टोअर मॅनेजमेंट, एसएमएस कॉल अलर्टसह गृहसुरक्षा, आयटी विभागाचे फूड ऑर्डरिंग वेबसाइट, जीम व्यवस्थापन प्रणाली, मोबाईल शॉपी व्यवस्थापन, वसतिगृह बुकिंग, व्यवस्थापन प्रणाली प्रकल्प, फर्निचर व्यवस्थापन प्रणाली, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाचे स्मार्ट टॉवर, इको ट्री, ई-सायकल, स्मार्ट हेल्मेट हे प्रकल्प प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.