तुळस येथे उद्या नाट्यप्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळस येथे उद्या नाट्यप्रयोग
तुळस येथे उद्या नाट्यप्रयोग

तुळस येथे उद्या नाट्यप्रयोग

sakal_logo
By

तुळस येथे उद्या नाट्यप्रयोग
वेंगुर्लेः तुळस-खरीवाडा येथील श्री देव वेताळ मंदिर येथे शनिवारी (ता.१३) रात्री १० वाजता मधुकर तोरडमल लिखित व अशोक तेंडुलकर दिग्दर्शित ऋणानुबंध हा दोन अंकी सामाजिक नाट्य प्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----------
कळसुली-हर्डी येथे विविध कार्यक्रम
कणकवलीः प्रेमदया प्रतिष्ठान (मुंबई) व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली (हर्डी) यांच्यावतीने कळसुली हर्डी येथे श्री स्वार्मी व समर्थ महाराजांचे मंदिर बांधले आहे. या मंदिरामध्ये १३ ते १५ मे या कालावधीत श्री स्वामींची मुर्ती स्थापना, कलशारोहण आणि पादुका पूजन सोहळा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. होणारे कार्यक्रम असेः शनिवारी (ता.१३) सायंकाळी ४ ते ६.३० श्री स्वामी समर्थ पालखी दिंडी सोहळा, ७ ते ८ हरीपाठ पठन व प्रवचन, रात्री ८ ते ९.३० कीर्तन, १० ते १२ महिला दशावतार नाटक ''विधीलेख''. १४ ला सकाळी ७ वाजता गणपती पूण्याहवाचन, ९ वाजता देवता स्थापना, १० ते १२.३० अग्नीस्थापना, गृहयज्ञ मुख्य हवन व धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ५.३० स्थानिक परिसरातील भजने, ६ ते ७.३० हरिपाठ पठन व प्रवचन, ७.३० ते ९ कीर्तन, रात्री ९.३० दशावतारी नाटक ''प्रयागतिर्थ''. १५ ला सकाळी ७ वाजता देवता पूजन, ७.३० वाजता कलशारोहण, ११.३० ते १२.३० मुर्ती मुहूर्त प्राण प्रतिष्ठापना, पादुका स्थापना, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी भजने, हरीपाठ व कीर्तन, ७ ते ८ संगीत रजनी कार्यक्रम, ८.३० ते १० महिलांचा फुगडी कार्यक्रम, रात्री १० वाजता डबलबारी बुवा विनोद चव्हाण-सुशील गोठणकर. सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मठ, कळसुलीचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.