चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

रत्नागिरी चार ठिकाणी
सिग्नल यंत्रणा होणार
रत्नागिरी ः शहरात चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर झाला. याची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. रत्नागिरी शहरातील सिग्नल यंत्रणा बंद झाली होती. कोरोना काळात वाहतूक पोलिसांकडून सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यानच रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेच्या कामासाठी रस्ते खोदाई करावी लागली. ही कामे करताना काही सिग्नलच्या विद्युत केबल तुटल्या गेल्या. मारूती मंदिर येथील शिवसृष्टीच्या कामासाठी या ठिकाणचे सिग्नलचे खांब काढावे लागले. रत्नागिरी शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढली असल्याने वाहतूक नियमनासाठी सिग्नल यंत्रणा आवश्यक झाली होती. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार वाहतूक पोलिसांनी रत्नागिरी नगर पालिकेकडे सिग्नल यंत्रणा सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार सुरू केला.

तिवरेत रविवारपासून मंदिरांचा जीर्णोद्धार
चिपळूण ः तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या तिवरे कुंभारवाडीत श्री गुरूदेव दत्त व विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा १४ ते १६ मे दरम्यान होणार आहे. रविवारी (ता. १४) दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत श्री दत्त व विठ्ठल रखुमाई आणि श्री गणेशमूर्तींचे पिंपळी ते कुंभारवाडीपर्यंत आगमन सोहळा होणार आहे. १५ ला सकाळी ७. ३० ते ८ वा. गणेशपूजन, प्रवेश, पुण्याहवाचन, सकाळी ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत प्रसादिक वास्तूशांती, मूर्तीस्थापना, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशपूजन आणि आरती, दुपारी १.३० ते २.३० पर्यंत महाप्रसाद, सायं. ६ ते ७ पर्यंत हरिपाठ, रात्री ७.३० ते ९ पर्यंत महाप्रसाद, रात्री ९ ते ११ कीर्तन. १६ ला सकाळी ४ ते ६.३० पर्यंत काकड आरती, सकाळी ११.३० ते १२.३० पर्यंत कलशारोहण, दुपारी १२.३० ते २ पर्यंत मंदिराचा उद्घाटन सोहळा, दुपारी २ ते ३.३० पर्यंत महाप्रसाद, दुपारी ३.३० ते ४.३० पर्यंत हळदीकुंकू, सायं. ६ ते ७ हरिपाठ, सायं. ७ ते ९ कीर्तन, रात्री ९ ते १०.३० पर्यंत महाप्रसाद, रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत भारूड होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तिवरे कुंभारवाडीतर्फे करण्यात आले आहे.

खेडला रविवारी पालखी नृत्यस्पर्धा
खेड ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ नाना चाळके यांच्या सहकार्याने धामणदेवी शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय पालखी नृत्यस्पर्धेचे आयोजन रविवारी (ता. १४) सायं. ८ वा. करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नामवंत संघ सहभागी होतील. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात १५ हजार रु. आणि चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात १० हजार रु. आणि चषक तसेच तृतीय क्रमांकासाठी रोख ७ हजार रु. आणि चषक व अन्य वैयक्तिक पारितोषिके आयोजकांच्यावतीने देण्यात येणार आहेत.