पोलिस, माविम मंडळाची सिंधुदुर्गनगरीमध्ये बैठक

पोलिस, माविम मंडळाची सिंधुदुर्गनगरीमध्ये बैठक

swt1110.jpg
02152
सिंधुदुर्गनगरीः ‘कायदासाथी’च्या बैठकीस उपस्थित मान्यवर.

पोलिस, माविम मंडळाची
सिंधुदुर्गनगरीमध्ये बैठक
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ः महिला आर्थिक विकास महामंडळ व महिला बालकल्याण यांच्यावतीने महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प नवतेजस्विनी योजनेंतर्गत जेंडर व न्यर्टशन घटकांतर्गत तालुकास्तरीय पोलिस व माविम मित्रमंडळ यांची ''कायदासाथी''ची बैठक झाली.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, लेखाधिकारी जमणे, पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगाडे, महिला बालविकास अधिकारी देशपांडे, ''सखी वन स्टॉप''च्या रुपाली प्रभू, महिला समुपदेशन केंद्रच्या समृधी मळेकर, ''सिंधुकन्या''च्या अध्यक्षा प्रीती सावंत, उपाध्यक्ष शीतल कांबळे, सचिव मृणाल सावंत, सदस्य मेघना दळवी, कायदासाथी सुप्रिया ढोलम व पुरुष जेडर टाकेकर, बावकर, केळुसकर, कदम, निकम, ''सिंधुकन्या''च्या दामिनी माने, आशिष मडवळ, मंगल तांबट, लविना लंगोटे, सायली कांबळी व सीआरपी वसुधा कदम व मयुरी मालंडकर आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन व्यवस्थापक गीता चौकेकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com