न्यायालयाच्या निर्णयानंतर वेंगुर्लेत शिवसेनेचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायालयाच्या निर्णयानंतर वेंगुर्लेत शिवसेनेचा जल्लोष
न्यायालयाच्या निर्णयानंतर वेंगुर्लेत शिवसेनेचा जल्लोष

न्यायालयाच्या निर्णयानंतर वेंगुर्लेत शिवसेनेचा जल्लोष

sakal_logo
By

swt1112.jpg
02153
वेंगुर्ले : पेढे भरवून आनंद व्यक्त करताना शिवसैनिक.

न्यायालयाच्या निर्णयानंतर
वेंगुर्लेत शिवसेनेचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ११ः महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आज न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर असल्याचे समजताच येथील शिवसेनेच्यावतीने कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत व सर्वांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला.
न्यायालयाच्या या निकालाने सर्वसामान्य शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. त्यामुळे जनसामान्यांची करुणा असणारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ही ओळख संपूर्ण महाराष्ट्राला या न्यायालयाच्या निकालातून पुन्हा एकदा मिळाली आहे. या निकालामुळे सर्वसामान्य शिवसैनिकात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विकासकामाची पोचपावती ठरणारा हा निकाल आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहर प्रमुख उमेश येरम, महिला शहर प्रमुख श्रद्धा बाविस्कर-परब, मच्छीमार सेल प्रमुख गणपत केळुसकर, अल्पसंख्यांक शहर प्रमुख शबाना शेख, प्रवक्ते सुशील चमणकर, श्यामसुंदर कोळंबकर, शिवाजी पडवळ, कृतिका कुर्ले, सावनी आडारकर, सुधीर धुरी, दयानंद सावंत, रमेश परब, रसिका राऊळ, सुरेंद्र वारंग, कृष्णा तुळसकर आदी उपस्थित होते.