रेल्वे वीजेवर धावणार

रेल्वे वीजेवर धावणार

२० (पान ५ साठी, संक्षिप्त)

हिसार जंक्शन – कोईमतूर गाडी विद्युत इंजिनवर धावणार

रत्नागिरी ः कोकण रेल्वेमार्गे धावणारी आणखी एक साप्ताहिक एक्स्प्रेस डिझेलऐवजी विद्युत इंजिनवर धावणार आहे. हिसार जंक्शन – कोईमतूर ही गाडी विद्युत इंजिनवर चालवली जात आहे. कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही गाडी हरियाणामधील हिसार जंक्शन ते दक्षिणेतील कोइमतूरपर्यंत धावते. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने डिझेल इंजिनच्याऐवजी इलेक्ट्रिक इंजिनच्या उपलब्धतेनुसार कोकण रेल्वेमार्ग धावणाऱ्या सर्वच गाड्या विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत. आता अवघ्या काही गाड्या डिझेल इंजिनसह धावत आहेत. ही गाडी विद्युत इंजिनसह धावत आहे. परतीच्या प्रवासफेरीमध्ये १३ मे पासून ही गाडी विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
-----

पालकमंत्र्यांनी घेतला विकास कामांचा आढावा

रत्नागिरी ः पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील गोळप आणि पाली जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, क्रीडा विभाग, जलसंधारण विभाग, खारभूमी विभाग, मेरीटाईम बोर्ड, गाळ उपसा, पोलिस विभाग, शिक्षण, आरोग्य विभाग आदी विभागांमार्फत सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध कामांचा तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत सुरू कामांचाही आढावा घेतला.
--

गोळपला आज बहुरंगी नमन

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप-गार्डीवाडी येथील श्री वडपिंपळ महापुरूष देवस्थान येथे शनिवारी (ता. १३) श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. दुपारी ३ ते ५ हळदीकुंकू, तीर्थप्रसाद दुपारी १२ पासून, रात्री १० वा. काटवली येथील बहुरंगी नमन होणार आहे.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com